Aurangabad

महाविद्यालयीन तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

महाविद्यालयीन तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : आज सकाळी ९ ते ९.३० वाजेच्या सुमारास जालना रोडवर मोंढा नाका येथून एक महाविद्यालयीन तरुणी रिक्षा मध्ये बसली होती. या रिक्षा मध्ये ती एकटीच होती. त्यामुळे रिक्षात बसल्या बसल्या त्या तरुणीला त्या रिक्षाचालका विषयी संशय आला त्यामुळे तिने त्या रिक्षाचालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले होते, परंतु त्या रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली नाही. त्या रिक्षा चालकाने अजूनच वेगाने रिक्षा चालवली. शेवटी घाबरून त्या तरुणीने थोडे पुढे जात नाही तर चालत्या वेगवान रिक्षातून उडी मारत स्वतःची सुटका करून घेतली. परंतु रिक्षातून उडी मारल्याने तिला जबर मार लागला होता व ती खूप घाबरलेली होती.

तेथूनच अँब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुपचे सदस्य निलेश सेवेकर हे आकाशवाणी कडे जात असतांना हा सर्व प्रकार त्यांच्या नजरेस पडला व त्यांनी तातडीने जखमी अवस्थेतील मुलीला रस्त्याच्या कडेला घेऊन जात तिला हिंमत देण्याचा प्रयत्न केला व तिची विचारपूस करत तिच्या घरच्यांना संपर्क साधत त्या मुलीच्या पालकांना तातडीने घटनेची माहिती दिली. तसेच त्या रिक्षाचालकाला तिथे जमा झालेली गर्दी दिसली व त्यामधून त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना तो रिक्षा चालक लगेचच तिथून पळून गेला. थोड्या वेळाने त्या मुलीचे मामा व भाऊ त्या घटनास्थळी पोहचले व मुलीला तातडीने जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊन तिच्यावर उपचार करून सुखरूप घरी परत घेऊन गेले. अद्यापपर्यंत शहरातील कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button