Amalner

टिनू उर्फ रितेश विरुद्ध अमळनेर पो ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे आणि खंडणीचा गुन्हा दाखल…

टिनू उर्फ रितेश विरुद्ध अमळनेर पो ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे आणि खंडणीचा गुन्हा दाखल…

अमळनेर येथे टिनू उर्फ रितेश बोरसे च्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि खंडणी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा पो ना डॉ शरद पाटील यांनी दाखल केला आहे. याबाबतीत सविस्तर माहिती अशी की
समक्ष पोलीस स्टेशनला हजर होऊन फिर्याद लिहून देतो की,शरद पाटील इन्कटॅक्स ऑफीस कडील जा.क्र. रा.क्र.अ.(जे.ए.जी.व्हॅट.क-०१४) २०२१-२२ करकसुरदार तपास/ब-८३ जळगांव दि.१३/०८/२०२१ मधील गैरअर्जदार व्यापारी नामे संदीप प्रभाकर बडगे (पारधी) बालाजी पेट्रोल पंप, प्रभुत्व कॉलनी, अमळनेर यांचा शोध
घेणेबाबतचे लेखी पत्र माझ्याकडे दिले असल्याने नमुद पत्रातील व्यापारी संदीप प्रभाकर बडगे याचा अमळनेर शहरात आज दि.२४/०९/२०२१ रोजी १३:१० वाजता माझी शासकीय मोटर सायकल क्र.MH-१९-DT-७०३७
ने रवाना होऊन अमळनेर शहरातील व्यापारी लोकांकडे विचारपूस करुन अमळनेर ते धुळे रोड बस स्थानकासमोरील भागवत रोडवर सार्वजनिक जागी इसम नामे रितेश उर्फ टिनू अरुण बोरसे रा. शिरुड नाका, अमळनेर हा फिर्यादी च्या मोटर सायकलीस आडवा होऊन माझा रस्ता अडवीला असता गाडी थांबविली तेव्हा तो
बोलला की, मी तुझ्या विरुध्द केलेला तक्रारी अर्ज मागे घेतो मला तु ५०,०००/- रुपये दे तुला मी तसा जबाब लिहून देतो. असे बोलला त्यावर मी त्यास बोललो की, मी का म्हणून तुला पैसे दयावेत असे बोललो असता त्यास राग येऊन त्याने मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन गच्ची धरुन चापटयानी मारहाण
करुन शर्टाचे वरील पॉकीट खिसा फाडून व दोन बटन तोडून शर्टचे नुकसान करुन करीत असलेले शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करुन व तुला मी जिवंत ठेवणार नाही. अशी जिवे ठार मारण्याची धमकी देऊ लागला. सदर वेळी तेथे जमलेले नागरिक मध्ये अमीत ललवाणी, राहूल ठाकूर, पप्पु भावसार, भरत पवार व
प्रा. जयश्री दाभाडे अशा लोकांनी त्यास समजविण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तो मला शिवीगाळ करुन तुला पाहून घेईल अशी धमकी देऊन सदर ठिकाणहून निघून गेला. त्यानंतर वरिष्ठांना सदर बाबत फोनवरुन कळविले असता त्यावरुन सपोनि श्री. राकेशसिंह परदेशी यांनी सदर ठिकाणी सफौ/ संजय पाटील, पोह/१६०५
सुनिल पाटील, पोना/१९७० कैलास शिंदे अशांना पाठविले असता मी त्यांना झालेला प्रकार सांगितला असता त्यांनी नमुद इसम रितेश उर्फ टिनू अरुण बोरसे याचा शोध घेणे कामी रवाना झाले.शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,खंडणी मागणे,जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून माझी रितेश उर्फ टिनू अरुण बोरसे रा. शिरुड नाका, अमळनेर याच्या विरुध्द कलम 353, 383,342,332,504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button