sawada

दोन आदिवासी तरुणाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाल वन विभागाचे अधिकारी महाजन विरूद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

दोन आदिवासी तरुणाला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाल वन विभागाचे अधिकारी महाजन विरूद्ध सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या पाल येथील वन विभागातील अधिकारी महाजन पुर्ण नाव माहीत नाही. यांनी करण नसताना जंगलात दिसले म्हणून दोन आदिवासी तरुणास चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करून यानंतर जंगलात दिसले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडलेली आहे.

सविस्तर वृत्त असे की, लोहारा ता.रावेर शिवारात ईदगाह व धरण चे दरम्यान रावेर रोडवर सार्व.जागी व ठिकाणी काही कारण नसताना दि.२९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दिलीप भारसिंग बारेला व त्याचे साथीदार फरिद सायबु तडवी रा. गुल्ली लोहारा ता. रावेर जि. जळगांव या दोन्ही आदिवासी तरुणांना चापटा बुक्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ देऊन इकडे जंगलात फिरताना दिसले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. वगैरे मजकुराची तक्रार थेट सावदा पोलिस ठाण्यात येऊन दिलीप भारसिंग बारेला यांनी दिल्यावर पाल वन कर्मचारी मुकेश महाजन तथा वन अधिकारी महाजन पूर्ण नाव माहीत नाही रा.रावेर यांच्या विरुद्ध पनाका र.नं.४८९/२०२१ भादवी कलम ३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यावेळी सावदा पोलिस ठाण्याच्या बाहेर ४० ते ५० लोहारा येथील आदिवासी बांधव देखील उपस्थित होते.

सदर घटनेची माहिती मिळताच वृत्त संकलनासाठी पोहोचल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित आदिवासी बांधव सदरील वन विभागाचे अधिकारी महाजन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी व स्वतःकरिता मासेमारी करून पार्ट्या खातात कार्यालयात व जंगलात वेळनुसार उपस्थित न राहता रोजंदारीचे माणसा (पंटर) भरोसे सर्व काही कारभार चालवतो. व मनमानी करतो अशी उघडपणे बोलत होते.

नुकतेच वन विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार कडे सावदा येथील राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, रमेश नागराज यांनी देखील लेखी तक्रार केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button