Amalner

Amalner: चोऱ्यांचे सत्र थांबेना..!प्रताप मिल कंपाऊंड मध्ये घरफोडी .. प्रा.देवेंद्र तायडे यांच्या घराचा दरवाजा तोडून सोने-चांदीचे दागिने लंपास

प्रताप मिल कंपाऊंड येथे झाली घरफोडी

प्रा. देवेंद्र तायडे यांच्या घराचा दरवाजा तोडून सोने चांदीचे दागिने केले लंपास.

अमळनेर ८ जानेवारीला प्रताप मिल कंपाऊंड येथे येथे चोरी झाली असून प्रताप महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला असलेले देवेंद्र तायडे गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रताप मिलमध्ये राहतात.ते नेहमीच वैयक्तिक कामासाठी त्यांच्या मूळ गावी किंवा कामाच्या ठिकाणी जात-येत असतात. दि.८ जानेवारीला दुपारी चार ते पाच च्या सुमारास आपल्या पत्नी व मुलीसह चोपडा येथे गेले होते .जाताना आपल्या शेजारी राहत असलेल्या गोसावीं ना ते सांगून गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना सकाळी साडेआठच्या सुमारास शेजारी राहत असलेल्या वेदांतने दूरध्वनी वरून तुमच्या घरी काहीतरी झाले असल्याचे दिसत आहे, असे कळवले.तुमच्या दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप बाहेर पडलेला आहे.हे कळताच आम्ही नऊ जानेवारीला अमळनेरला घरी आलो. घरात मी माझी पत्नी छाया गेले असता ,आम्हाला घरातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले दिसले. घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले सोने व चांदीचे दागिने, त्यांच्या पावत्या चोरट्याने पसार केले होते. सोन्याच्या दागिन्यांमध्ये १२ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके.चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र. एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल .दीड ग्रॅम वजनाची कानातील बाही.एक ग्रॅम सोन्याची चिप. सात भार वजनाचे चांदीचे पैजण असे एकूण ६८ हजार ६०० रुपयांचे दागिने चोरीला गेले असल्याचे आम्हाला दिसले.तेव्हा आम्ही अज्ञात चोरट्याचा नावे अमळनेर पोलीस स्टेशनला भादवि कलम ४५४, ४५७, ६८० प्रमाणे फिर्याद नोंदविलेली आहे.सदर घरफोडीचा तपास स.फौ. ८५७ रामकृष्ण कुमावत करीत आहेत.

अशीच घरफोडी नगरपरिषदेत परिषदेत नोकरीला असलेल्या राधा नेतले यांच्याकडे घडला. पण चोरट्याला घराच्या कडीकोंडा तोडता न आल्याने होणारी घरफोडी टळली.

पण प्रताप मिल कंपाउंडमध्ये घडलेल्या अशा दोन्ही घटना बघून प्रताप मिल कंपाउंड मधील नागररिकां मध्ये असुरक्षिततेचे वातावरण झाले आहे. चोरट्याना लवकरात लवकर पकडावे व भीतीचे वातावरण दूर करावे अशी अपेक्षा प्रताप मिल कंपाऊंडमध्ये राहत असलेले नागरिक करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button