Pandharpur

जुन्या कपड्याच्या गोदामाला आग लागली असता आर्थिक मदत करण्यासाठी धावून गेले समाजसेवक संजय बाबा ननवरे

जुन्या कपड्याच्या गोदामाला आग लागली असता आर्थिक मदत करण्यासाठी धावून गेले समाजसेवक संजय बाबा ननवरे

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील कर्नल भोसले चौक येथील 11 फेब्रुवारी 2021 रोजी पहाटे 4 वाजता लागलेल्या आगीत काशी कापडी समाजातील गोर गरीब महिलांचे जुन्या कपड्याच्या दुकानाच्या गोडाऊनला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जुने कपडे विकण्याचा काशी कापडी समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय असून गेली 100 वर्षाहून अधिक कर्नल भोसले चौक पंढरपूर येथे जुन्या कपड्याची दुकानी आहेत. गरीबांना नवीन कपडे घेणे परवडत नाही त्यामुळे गरिब गरजूवंत ह्या ठिकाणाहून कपडे नेत असतात. अशातच त्यांच्या कपड्यांच्या गोडाऊनला आग लागल्यामुळे त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. कोरोना सारख्या महामारी नंतर कुठेतरी चांगले दिवस येतील असं स्वप्न उराशी बाळगलेल्या या महिलांनाच्या पदरात निराशा मिळाली आहे. अशातच समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी स्वखर्चातून गरीब महिलांना दहा हजार रुपये आर्थिक मदत व धनंजय दिलीप पाठक यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आले संजय बाबा ननवरे पुढे म्हणाले की आपण ही समाजात काही देणे लागत असल्यामुळेया महिलांची आर्थिक दुर्बल घटक परिस्थिती असल्यामुळे मी या महिलांना स्वखर्चातून आर्थिक मदत देत आहे यावेळी प्रमुख उपस्थिती समाजसेवक संजय बाबा ननवरे व आदि कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button