Aurangabad

जिल्ह्यातील 972 ऑनलाइन शाळा सुरू

जिल्ह्यातील 972 ऑनलाइन शाळा सुरू

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीतील ९७२ ऑनलाइन शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. यामध्ये महानगरपालिकेच्या ७२ आणि खाजगी ९०० शाळाचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या वतीनं यंदाच्या शैक्षणिक वर्षात नवीन चार मराठी आणि चार उर्दू शाळा सुरू करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं कळवण्यात आले आहे. मनपा शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आजपासून आपल्या शालेय परिसरात सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली असून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्यात येत आहे.

आज सकाळी मनपा शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी अनेक शाळांना भेटी देऊन कोरोना संदर्भात सूचनांचं पालन करण्यास शिक्षकांना सांगितले. शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यास आणि ऑनलाईन शिक्षणाबाबत मार्गदर्शन केलं. सर्व शाळांचा परिसर पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजून जावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button