Jalana

67,000/- रुपयेचे किमती मोबाईल फिर्यादीस परत सदर बाजार पोलीसाची कामगिरी

67,000/- रुपयेचे किमती मोबाईल फिर्यादीस परत
सदर बाजार पोलीसाची कामगिरी

संजय कोल्हे जालना

जालना : दि. 02.09.2021 रोजी सायंकाळी फिर्यादी शेख सिराज मंहमद वय 30 वर्षे व्यवसाय नौकरी, रा. कैसर पार्क हर्सुल औरंगाबाद यांनी पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे हजर येऊन लेखी फिर्याददिली की, जालना बस स्थानक येथे सांयकाळी 20:00 वा चे सुमारास ते जालना येथुन औरंगाबाद येथे जाणेस साठी बस स्थानक जालना येथे प्लॉट फॉर्म क्रमांक 04 वर बस मध्ये बसत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्याचे पॅन्ट चे खिशात असलेला ॲपल कंपणीचा एक्स आर 128 जी बी लाल रंगाचा फोन गर्दीचा फायदा घेत चोरुन नेला वगैरे फिर्याददिले वरुन पोलीस ठाणे सदर बाजार जालना गुरन 640/2021 कलम 379 भादवी प्रमाणे दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक अरविंद वरगणे हे करीत आहेत.
आज रोजी गुन्हयाचा तपास करत असताना मिळालेल्या माहीती प्रमाणे गुन्हयात गेला माल मोबाईलचा शोध घेत असताना मोबाईल हा श्री चव्हाण डेपो मॅनेजर यांचे कडे बस स्थानक स्वच्छता कर्मचारी यांनी हजर केल्याने त्यानी सदरचा मोबाईल हा पोलीस ठाणेस आणुन हजर केला होता. सदर मोबाईल मध्ये फिर्यादीचा महत्वाचा डाटा असल्याने फिर्यादी यांचे कडुन ताबा पावती लिहुन घेऊन त्यास त्याचा ॲपल कंपणीचा एक्स आर 128 जी बी लाल रंगाचा फोन किमती 67,000/- रुपयेचा जशास तसा फिर्यादी यांना ताब्यात दिला आहे.
सदरची कामगीरी ही मा. श्री. विनायक देशमुख, पोलीस अधिक्षक, जालना, श्री. विक्रांत देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. सुनिल पाटील उप विभागीय पोलीस अधिकारी, जालना यांचे मार्गदर्शना खाली, श्री. अनिरुध्द नांदेडकर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे सदर बाजार जालना, श्री रमेश रुपेकर, भोकरदन नाका चौकी प्रमुख, तपासीक अंमलदार अरविंद वरगणे, दामोधर पवार, समाधान तेलग्रे, महीला कर्मचारी सुमीत्रा अंभोरे, यांनी पार पाडली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button