Bollywood

चेहऱ्यातून काढले 67 काचेचे तुकडे ..!”ह्या” लोकप्रिय अभिनेत्रीने अपघातात गमावलं सर्वस्व..

चेहऱ्यातून काढले 67 काचेचे तुकडे ..!”ह्या” लोकप्रिय अभिनेत्रीने अपघातात गमावलं सर्वस्व..

मुंबई बॉलिवूड मध्ये रोज नवीन सुंदर चेहरे येतात जातात..!अभिनय क्षेत्रात कार्यरत असणारे शेकडो सितारे हे त्यांच्या सुंदरतेमुळे ओळखले जातात किंवा लोकप्रिय होतात.अर्थात याला काही सितारे अपवाद देखील आहेत. चेहरा खूप काही सांगतो,बोलतो आणि चेहऱ्यावरच बॉलिवूड मध्ये ओळख निर्माण करणं सोपं असत अश्या ह्या चेहऱ्यालाच धक्का बसला तर..? होय बॉलिवूड मधील अत्यन्त सुंदर आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय झालेले अभिनेत्रीला आपला चेहरा गमवावा लागला. कोण आहे ही अभिनेत्री..? आता सध्या काय करते आहे.? चला तर जाणून घेऊ या..

एका अपघातात चेहरा गमावून आपलं सर्वस्व गमावाव लागलं अश्या एका अभिनेत्री ला जी कमी वेळात लोकप्रिय झाली.
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी ही प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचेही खूप कौतुक झाले. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने महिमाने बॉलिवूड चित्रपटसृष्टीत प्रवेश करताच प्रेक्षकांच्या मनात एक खास ओळख निर्माण केली होती. जरी ती सध्या चित्रपट विश्वापासून दूर आहे, पण तरी ती आजही लोकप्रिय आहे.

परदेस ह्या सुभाश घई यांच्या चित्रपटातून महिमा चौधरीने 1997 मध्ये बॉलिवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात सुपरस्टार शाहरुख खानसोबत महिमाने काम केलं. या चित्रपटात अपूर्व अग्निहोत्री, अमरीश पुरी, आलोक नाथ यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते. महिमाचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला.

महिमा चौधरीने यानंतर आणखी चित्रपटांमध्ये काम केले. सुप्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री अचानक गायब झाली. परंतु असे का घडले याची माहिती फारच कमी लोकांना असेल. खरंतर त्याच्यासोबत एक मोठा अपघात घडला, ज्यामध्ये त्याचा चेहरा खराब झाला. ज्यामुळे तिचं फिल्मी करिअर संपलं.

तिच्यासोबत घडलेला हा अपघात साधासुधा अपघात नव्हता अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. महिमाने स्वत: या भीषण अपघाताबद्दल सांगितले. ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बंगळुरूमध्ये असताना हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले. तिथे एका ट्रकने त्याच्या कारला धडक दिली आणि तिच्या कारची विंडशील्ड फुटून तिच्या चेहऱ्याला दुखापत झाली.चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून 67 तुकडे काढन्यात आले.खूप सारे टाके आणि सर्जरीमुळे तिला घरातच राहावे लागले. ज्यामुळे तिला उन्हात बाहेर जाण्याची देखील परवानगी नव्हती. तिची संपूर्ण खोली पूर्णपणे काळ्या पडद्यांनी झाकली होती, जेणे करुन सुर्य प्रकाश तिच्या चेहऱ्यावरती पडू नये. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सुर्याच्या UV किरणामुळे तिच्या चेहऱ्यावर डाग पडू शकतील, त्यामुळे चट्टे टाळण्यासाठी तिला यूव्ही किरणांपासून दूर राहावे लागले.

महिमाने 2006 मध्ये बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. हे नाते फार काळ टिकले नाही. 2013 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अभिनेत्री महिमा आणि बॉबी यांना आर्याना चौधरी नावाची मुलगी देखील आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button