Amalner

अमळनेर शहरासाठी ५००० डोस उपलब्ध लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता साहेबराव पाटील यांची मागणी शहरात टप्प्याटप्प्याने प्रभागांमध्ये होणार लसीकरण

अमळनेर शहरासाठी ५००० डोस उपलब्ध लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता साहेबराव पाटील यांची मागणी शहरात टप्प्याटप्प्याने प्रभागांमध्ये होणार लसीकरण

अमळनेर : अमळनेर नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांसाठी ५ ऑक्टोबर पर्यंत covid-19 लसीकरणाचे एकूण डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 52 हजार 815 एवढी आहे,तर पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची संख्या 37 हजार 995 असून दुसरा डोस घेतले लाभार्थ्यांची संख्या 15720 एवढी आहे. लसींच्या पुरवठ्याचे अल्प प्रमाण असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी लसी उपलब्ध होण्याची मागणी लोकनियुक्त नगराध्यक्ष जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटिल यांच्या मागणीनुसार ६ ऑक्टोबर रोजी 5000 लसी अमळनेर शहरासाठी तालुका व जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या असून सदर लसीकरण नियोजित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व नगर परिषद दवाखाना यांचेमार्फत प्रभागनिहाय टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता साहेबराव पाटील यांनी नागरिकांना केले आहे.सदर लसींची मागणी लोकनियुक्त नगराध्यक्षा यांनी प्रशासनाकडे केली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button