Marwad

? मारवड येथे कोरोना बंदोबस्तावर असतांना 38 वर्षीय  होमगार्डचा मृत्यू…

मारवड ता अमळनेर येथे कोरोना बंदोबस्तावर असतांना 38 वर्षीय होमगार्डचा मृत्यू ...

मारवड अमळनेर येथील श्री. किशोर युवराज पाटील वय.38 हे मारवड पोलीस स्टेशन येथे होमगार्ड म्हणुन कार्यरत होते. कोरोना ( कोवीड)19 च्या होमगार्ड म्हणुन बंदोबस्तावर असतानां आज दि.21/5/2020 गुरुवार रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास त्यांना दोन ते तीन झटके आले.त्यांना तात्काळ दवाखान्यात नेण्यात आले असता डॉक्टरानीं त्यांना मृत घोषीत केले. गेल्या दहा- बारा दिवसापासुन होमगार्ड म्हणुन ते कोरोना-19 बंदोबस्तावर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि.21/5/2020 रोजी रात्री 9 वाजता गोवर्धन येथुन त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button