Latur

साकोळ आश्विनी सूर्यवंशी हत्याकांड पीडित कुटुंबाची भिम आर्मीचे कार्यकारणी सदस्य तथा गुजरात प्रभारी अशोक कांबळे सह लातुर औसा व निलंगा देवणी कार्यकर्त्यांसह सांत्वनपर भेट

साकोळ आश्विनी सूर्यवंशी हत्याकांड पीडित कुटुंबाची भिम आर्मीचे कार्यकारणी सदस्य तथा गुजरात प्रभारी अशोक कांबळे सह लातुर औसा व निलंगा देवणी कार्यकर्त्यांसह सांत्वनपर भेट

लक्ष्मण कांबळे लातूर

लातुर : लातुर जिल्हातील सकोळ ता शिरूर अनंतपाळ या ठिकाणी बौद्ध तरुणी अश्विनी सूर्यवंशी हिची हत्या की सुनियोजित कट करून हत्या करणयात आली होती .या प्रकरणातील आरोपीला अद्याप अटक का? करण्यात आली नाही म्हणून झालेल्या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर चौकशी व्हावी म्हणून भिम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख मा प्रफुल्ल शेंडे यांच्या सूचनेनुसार कार्यकारणी सदस्य तथा गुजरात प्रभारी मा अशोक कांबळे. महाराष्ट्र संघटक अक्षयजी धावारे. मराठवाडा उपाध्यक्ष विनोद कोल्हे. लातुर जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे. रावण समींदर. लातुर जिल्हा शहर पदाधिकारी तसेच देवणी शिरूर अनंतपाळ औसा निलंगा आदी तालुक्यातील जवळपास दोनशे ते अडीशे भिम आर्मीच्य कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन केले सांत्वन या वेळ पीडित मुलीच्या वडिलांनी व्यथा मांडताना असे सांगितले की पोलीस प्रशासन हे सुस्त असुन त्यांनी माझी माझ्या मुलीच्या मारेकऱ्यांना आद्यप अटक करून त्यांनी त्यांचे कर्तव्य बाजवायला पाहिजे होते पण ते त्यांनी केलेल नाही म्हणून पीडितेच्या वडिलांनी पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध केला तसेच स्थानिक आमदार खासदार मंत्री यांनी पण माझ्या मुलीच्या हत्याकांडाबद्दल आवक शब्द काढला नाही म्हणून त्यांनी यांचेवर ही तीव्र आशा शब्दात टीका केली व त्यांचा ही जाहीर निषेध केला
पीडितेच्या वडिलांची व्यथा ऐकून घेतल्या नंतर मन हेलावून टाकणारी ही घटना अस्थानही आमदार खासदार मंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेणे गरजेचे असताना दखल ना घेतले मुळे भिम आर्मी कडूनही यांचा जाहीर निषेध नोंदवत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शिरूर अनंतपाळ च्या तहसीलदार यांना घेराव घालून जाब विचारणा केली असता तहसीलदार यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिल्या नंतर पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपीला का अटक केली नाही का? आरोपीला पोलिसांची पाठराखण होत आहे या बाबत याबाबत चर्चा करण्यात आली असता लवकर लवकरत आरोपीला अटक करून कडक शासन करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
जर आश्वासन देऊन ही आरोपीला अटक झाली नाही तर लवकरच निषेध मोर्चा काढण्यात येईल असं इशारा या वेळी देण्यात आला आहे

[**न्याय हा जात बघून दिला जातेय की काय असा सवाल भिम आर्मीचे कार्यकारणी सदस्य तथा गुजरात प्रभारी मा अशोक कंबळे यांनी प्रशासनाला सवाल केला आहे पीडितेला न्याय मिळेपर्यंत भिम आर्मी सोबत राहील अशी ग्वाही दिली ]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button