Yawal

टेम्पो ट्रव्हलरची दुचाकीस धडक.. ३३ वर्षीय महिला ठार…

टेम्पो ट्रव्हलरची दुचाकीस धडक.. ३३ वर्षीय महिला ठार…

यावल प्रतिनिधी अमित एस तडवी

शहरातील रेल्वे उड्डाणपूलानजीक टेम्पो ट्रव्हलरन दुचाकीस जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील ३३ वर्षीय महिला मृत्यू झाल्याची घटना घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वरखेडी ता. पाचोरा येथील सुल्ताना बी शकील काकर (वय – ३३) ह्या पती सोबत दुचाकीने दि. १४ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्यांच्या वडिलांना बघण्यासाठी जात असतांना शहरातील रेल्वे उड्डाणपूलानजीक त्यांच्या दुचाकीस जारगाव चौफुलीकडुन भडगावच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर (क्रं. एम. एच. १९ – वाय – ६३८५) ने मागावुन जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागील बाजुस बसलेल्या सुल्ताना बी शकील काकर ह्या खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने सुल्ताना बी शकील काकर यांना पुढील उपचारासाठी जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील टेम्पो ट्रॅव्हलर व चालक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र नरवाडे हे करीत आहे. मयत सुल्ताना बी शकील काकर यांचे पाश्चात्य पती, एक मुलगी, दोन मुले असा परिवार असुन त्यांचे निधनाने वरखेडी सह परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button