Amalner

विजेचा शॉक लागून 32 वर्षीय महिलेचा मृत्यू..!

विजेचा शॉक लागून 32 वर्षीय महिलेचा मृत्यू..!

अमळनेर पिण्याचे पाणी भरण्यासाठी म्हणून लावलेली विजेची मोटर बंद करताना विजेचा शॉक लागल्यामुळे ३२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथे घडली.

पाडळसरे येथील रहिवासी ही तरुण विवाहित महिला मोटार बंद करण्यासाठी पिन काढण्यासाठी गेली असता अचानक विद्युत पुरवठा चालू झाला. त्यांच्या हातातच वायर अडकून राहिल्याने विजेचा शॉक लागला आणि त्या जागीच कोसळल्या. सदर महिलेला खाजगी दवाखान्यात नेले असता डॉ नी त्यांना मृत घोषित केले. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. सासू सासरे, पती, दीर, एक शाळकरी मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. त्या ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी सुखदेव कोळी यांच्या सून तर पाडळसरे धरणावरील वीज कर्मचारी संतोष कोळी यांच्या पत्नी होत्या.सचिन कोळी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद मारवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनेचा तपास हवालदार मुकेश साळुंखे करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button