Ratnagiri

3 वर्षाच्या आदिवासी मुलीवर अत्याचार करून हत्या करणार्यां नराधामाला फाशी द्या:बिरसा क्रांती दलाची मागणी.

3 वर्षाच्या आदिवासी मुलीवर अत्याचार करून हत्या करणार्यां नराधामाला फाशी द्या:बिरसा क्रांती दलाची मागणी.

रत्नागिरी : पेण येथील स्व.कु वैभव जयराम वाघमारे या आदिवासी 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करणा-या आरोपीला फाशी शिक्षा द्यावी,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख देशमुख यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आरोपी नराधामाच्या विरोधात फास्टट्रॅक कोर्टात केस चालविण्यात यावी.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे गरजेचे असून त्या दृष्टीने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासंबधी कार्यवाही करण्यात यावी . पीडितेच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे. शासनाच्या मनोधैर्य योजनेतून मदत करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे पिडीतेच्या कुटुंबीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्यात करिता कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
समाजामध्ये अपप्रवृत्ती वाढत असून पोलिसांचा धाक कमी झाला आहे अशा प्रकारच्या घटना रोखण्याकरिता पोलिसांनी त्यांचा धाक कायम ठेवणे गरजेचे आहे तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याकरितां पोलिसांनी कारवाई करावी. पीडितेच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही कायम असून त्यांना बिरसा क्रांती दलाच्या मागणी वरुन सर्वतोपरी मदत शासनाकडून दिले पाहिजे. यापूर्वीही या आरोपीने अपहरण व बलात्कार या सारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यामुळे तो अशा प्रकारचे गुन्हे करण्यात सराईत असून त्याला कठोरात कठोर शासन करून नंतर फासावर लटकवा अशी मागणी संघटनेच्या वतीने करीत आहोत.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी गृहमंत्री यांच्या कडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button