World

?Big Breaking..8 तासांमध्ये मोठे 3 भूकंप ! तब्बल 12 KM पर्यत ‘ त्सुनामी ‘ येण्याचा इशारा

?Big Breaking..8 तासांमध्ये मोठे 3 भूकंप ! तब्बल 12 KM पर्यत ‘ त्सुनामी ‘ येण्याचा इशारा

न्यूजीलँड: ४ मार्च (गुरुवार) दुपारी ८ तासांत मोठे तीन भूकंप झाले. तिन्ही भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की, त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकले असते. परंतू याक्षणी कोणतीही जीवित हानी झाली नाही. पहिल्या भूकंपाची तीव्रता ७.३, दुसऱ्या ७.४ त्यानंतर तिसऱ्या ८. १ तीव्रतेचे भूकंप आले. यानंतर तोकोमारू खाडीमध्ये छोटी त्सुनामीची लाट दिसली. दक्षिण प्रशांत सागर ते मध्य अमेरिकेपर्यंत त्सुनामी अलर्ट जाहीर केला आहे.
या भूकंप आणि त्सुनामीमुळे न्युजीलॅंड, अमेरिका, मध्य आणि दक्षिण अमेरिकेपर्यंत नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण झाला आहे. नेशनल वेदर सर्व्हिस पॅसिफिक सुनामी सेंटरने ऑस्ट्रेलिया आणि न्युजीलॅंड येथे त्सुनामीचा इशारा दिला.
न्यूजीलँड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेजवळ असलेल्या बेटांवर १ ते ३ मीटर उंच त्सुनामीची लाट येणार असलयाचे सांगितले गेले आहे. यानंतर लोक उंच ठिकाणी स्थलांतरित झाले.
४८२ किलोमीटर क्षेत्रफळामध्ये ८ तासांच्या कमी कालावधीमध्ये सलग तीन भूकंप येणे हि दुर्मिळ घटना आहे. पहिल्या दोन भूकंपांमधील अंतर जास्त होते. दोन्हीचा संबंध एकमेकांशी नव्हता. पण असे मानले जात आहे की, दुसऱ्या भूकंपामुळे तिसरा भूकंप आलं आहे. ज्यामुळे भूस्खलन होण्याचा धोका होऊ शकतो.
न्यूजीलँच्या सर्वात जवळ ७.४ तीव्रतेचा भूकंप आला. त्यामुळे टेक्टॉनिक प्लेट्समध्ये हॉरीझॉन्टल दाब निर्माण झाला. परंतू यामुळे त्सुनामी येण्याची संभाव्यता कमी होती. त्यानंतर दुसरा भूकंप ७.३ तीव्रेतेचा आला. हा कमी खोलीचा भूकंप होता. यामुळे पॅसिपिक टेक्टॉनिक प्लेटमध्ये हालचाल झाली. या भूकंपामुळे इंडो- ऑस्ट्रेलियन प्लेट हादरले. त्यामुळे तिसरा आणि सर्वात शक्तिशाली भूकंप आला. याची तीव्रता ८.१ होती. यामुळे त्सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आली होती
न्यूजीलँडच्या वैज्ञानिकांच्या मतानुसार, ८.१ तीव्रतेचा भूकंप ७ तीव्रतेच्या भूकंपापेक्षा ३० पट जास्त ऊर्जा रिलीज करतो. २६ मे २०१९ रोजी पेरूमध्ये आलेल्या ८.० तीव्रतेच्या भयानक भूकंपापेक्षा जास्त खतरनाक होता. तथापि, या भूकंपात कोणतीही जीवित हानी अथवा जखमी झाल्याचे कोणत्याही प्रकारचे वृत्त नाही.
इक्वाडोर, कोस्टा रिका, निकारागुआ, मासिस्को, चिली, कोलंबिया, पेरू सह अनेक ठिकाणी त्सुनामी येण्याची चेतावणी देण्यात आली आहे. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी सकाळपर्यंत कोणत्याही वेळी त्सुनामी या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतू आजून त्सुनामी आल्याची कोणतीही वार्ता आली नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button