Amalner

अमळनेर 3 बंदुकीच्या फैरी..साश्रु नयनांनी तिरंग्यात लपेटून दिला शहीद जवानाला अखेरचा निरोप..!तेरी मिट्टी में मिल जांवा गुल बनके मैं खिल जांवा इतनसी हैं आरजु..!

3 बंदुकीच्या फैरी..साश्रु नयनांनी तिरंग्यात लपेटून दिला शहीद जवानाला अखेरचा निरोप..!तेरी मिट्टी में मिल जांवा गुल बनके मैं खिल जांवा इतनसी हैं आरजु..!

अमळनेर प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा येथील जवान गणेश सोनवणे यांचा कर्तव्यावर असतांना जम्मू काश्मिर येथे दि ५ रोजी अपघाती मृत्यू झाला. त्याचे शव आज ७ रोजी सायंकाळी ६ वाजता पातोंडा गावात दाखल झाले.यावेळी गावकऱ्यांनी मोठा तिरंगा बनवून गावातून मिरवणूक काढली. पातोंडा येथील ऊपबाजार समितीच्या प्रांगणात शोकाकूल वातावरणात शासकिय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेसह परिसरातील जनसमूदाय ऊपस्थीत होता याावेळी ग्रामस्थ व जिल्हा सैनिक दलातील जवानांनी देशभक्तीपर गीते व घोषणा देण्यात येत होत्या. गाव वेशी पासून अंत्यसंस्कारासाठी मोठा जनसमूदाय शिस्तीत जात होता साश्रू नयनांनी त्यांचे कूटूंबासह ग्रामस्थांनी जवान गणेश सोनवणे यांना अखेरचा निरोप दिला.

विशेष म्हणजे महिलांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी प्रशासनाचे वतिने उपविभागीय अधिकारी, तहसिलदार मिलींद वाघ, पो नि जयपाल हिरे इ ऊपस्थित होते तर जिल्हा सैनिक अधिकारी संजय महाजन सहाय्यक अधिकारी रतिलाल महाजन १४ ईन्फंट्री ब्रिग्रेडचे सुभेदार शरद सोनवणे, विष्णू कच्वे ,विक्की पाटील, अरूण जाधव हे त्यांचे सहकारी ऊपस्थित होते. ३ वेळा बंदूकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. तिरंग्यात लपेटलेला गणेश यांच्या देहाला कूटूंबातील नातलग व त्यांच्या मूली प्रिया व पियू तसेच पत्नी सिमा यांचे समक्ष हजारोंच्या उपस्थितीत देशप्रेमी जवनाला साश्रु नयनानी निरोप देण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी रांगोळी काढून श्रध्दांजली फलक व फूलांनी सजावट केली होती
सध्या नासिक येथील अंबड गावानजीक असलेल्या कंफर्ट झोन सोसायटीत कूटूंहाचा रहिवास होता सैन्यदलातून अवघ्या २५दिवसात ते सेवानिवृत्त होवून घरी येणार होते. गणेश सोनवणे यांचे पश्चात वृध्द आई पत्नी सिमा व एक १२ व दूसरी ९ वर्षाची अशा २ मूली आहेत
गणेश हा १४ मराठा बटालियन मध्ये सेवेत होता.१६ वर्ष ९ महीने देश सेवेसाठी ह्या जावनाने दिली. येत्या डिसेंबर महिन्यात १७ वर्ष सेवा पुर्ण करून घरी परतणार होता.परंतु त्याअगोदरच सेवेत असताना त्याचे निधन झाले आहे. वयाच्या २० व्या वर्षी गणेश देशसेवेत दाखल झाला होता. त्याचा देह (शव) आर्मीचे सर्व शासकीय इतमामात विमानाने मुंबईत आणि तेथून रुग्णवाहिकेने सैनिकी निगराणी आणि इतमामात पातोंडा येथे आणण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button