Maharashtra

शिरसाळे येथील २७ वर्षीय महिलेचा विनयभंग करत दिली जिवे मारण्याची धमकी…

शिरसाळे येथील २७ वर्षीय महिलेचा विनयभंग करत दिली जिवे मारण्याची धमकी…

अमळनेर:- तालुक्यातील शिरसाळे येथील २७ वर्षीय महिलेचा विनयभंग करत आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली असून मारवड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २८ जुलै रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास शिरसाळे येथील २७ वर्षीय महिला घरी एकटी असल्याचे पाहून त्यांच्या दोन तीन घरआड गुरांचा गोठा असलेला केशरलाल उर्फ भाऊ युवराज कोळी याने घरात घुसून महिलेचा पदर ओढून अंगावर ओढले व आता आपण एकटेच आहे असे वाईट उद्देशाने म्हणाला. त्यावर महिला ओरडू लागल्याने आरोपीने महिलेच्या पोटावर लातांनी मारहाण करत ब्लाऊज फाडले. महिलेचे जेठ सोडवणूक करण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ केली. झालेला गोंधळ पाहून आरोपीचा चुलत भाऊ विजय सुरेश कोळी, वडील युवराज कोळी, काका सुरेश कोळी हे देखील तेथे आले व सोडवणूक करण्यासाठी आलेल्या लोकांना शिवीगाळ करू लागले. सदर महिलेचा पती बाहेरून आल्याने काय झाले असे विचारपूस करू लागला असता त्यास ही धक्काबुक्की केली. व एकेकाला मारू अशी धमकी दिली. अशी फिर्याद सदर महिलेने दिल्याने मारवड पोलिसात भादवि कलम 354, 448, 323, 504,506 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना. विशाल चव्हाण करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button