Mumbai

Mumbai: राज्यातील 25 हजार कर्मचारी आज कर्मचारी काळया फिती लावून करणार अध्यापन…

1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा..

राज्यातील 25 हजार कर्मचारी आज कर्मचारी काळया फिती लावून करणार अध्यापन…

आझाद मैदानावर आंदोलनाचा 63 वा दिवस..

अमळनेर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील 25 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 23 डिसेंबरपासून आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत. शासनाने आतापर्यंत फक्त आश्वासने दिली कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची न्याय मागणी असल्याने महाविकास आघाडी सरकारने यावर त्वरित निर्णय घेऊन राज्यातील 25 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. संघटनेचे पदाधिकारी व अध्यक्षा संगीताताई शिंदे व कोअर कमिटीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पत्रात लिहिले की आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी नाहीतर इच्छामरणाची परवानगी द्यावी असे आवाहन संगीताताई शिंदे व कोअर कमिटीने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केले आहे.

राज्यातील सर्व तालुक्यातील मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षेक तर कर्मचारी दि .२३ / २ / २०२२ व २४ / २/.२०२२ रोजी होणार संप रद्द करण्यात आला आहे शासनाशी झालेल्या चर्चा इतर मुद्दय़ावर सकारात्मक चर्चा झाली.संप मागे घेण्यात आलेला आहे तरी १ नोव्हे , २००५ पूर्वी नियुक्त महाराष्ट्रातील २५००० शिक्षकांचा प्रश्न तसाच आहे.आज मुंबई आझाद मैदानावर ६३ वा. दिवस आहे.आपण सरकारचा निषेध करायचा आहे. याची सर्वानीं नोंद घ्यावी , आपण केलेल्या सहकार्य करणार याची शाश्वती आहे. धन्यवाद ! अशीच एकजुट राहू दयावी व एकत्र येवून फोट ग्रूपवर टाकावेत तरी सर्वानीं आपापल्या शाळेवर काळी फीत लावून काम करावे.श्री.संभाजी पाटील सर जिल्हाध्यक्ष , जळगाव शिक्षण संघर्ष संघटना.
सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी शिक्षण संघर्ष संघटना यांनी नोंद घ्यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button