Kolhapur

कोरपना तालुक्यातील निराधारांचे २२३ प्रकरण मंजुरएकही निराधारांना योजनेपासून वंचित ठेवणार नाही अध्यक्ष उमेश राजूरकर

कोरपना तालुक्यातील निराधारांचे २२३ प्रकरण मंजुरएकही निराधारांना योजनेपासून वंचित ठेवणार नाही अध्यक्ष उमेश राजूरकर

मनोज गोरे कोपरना

कोपरना : कोरपना संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी उमेश राजूरकर यांची आमदार सुभाष धोटे यांच्याशिफारशीनुसार नियुक्ती झाल्यानंतर सोमवारला दुपारी १२ वाजता तहसील कार्यालयात उमेश राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत संजय गांधी विधवा व अपंग योजने अंतर्गत ४४ श्रावणबाळ योजने अंतर्गत १३४ इंदिरा गांधी विधवा योजने अंतर्गत ३ इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजनेअंतर्गत ३५ दुर्धर आजार परितक्त्या सिकलसेल घटस्पोटीत योजने अंतर्गत ७ अश्या २२३ प्रकरण मंजूर तर १२ प्रकरण नामंजूर करण्यात आले.
निराधार समितीची निवड झाल्यापासून प्रत्येक महिन्याला बैठक लावून जास्तीत जास्त निराधार अंध अपंग वृद्धपकाळ सिकलसेल घटस्फोटीत विधवा महिलांना लाभ मिळवून देऊ तसेंच तालुक्यातील एकही गरिबांना या योजनेपासून वंचित ठेवणारं नसल्याचे आश्वासन यावेळी अध्यक्ष उमेश राजूरकर यांनी दिले.
बैठकीत जास्तीत जास्त प्रमाणात प्रकरणांना मंजुरी मिळाल्याने दीर्घ काळापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या निराधार विधवा वृद्ध अंध अपंग नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी अध्यक्ष उमेश राजूरकर पदसिद्ध सचिव तथा तहसीलदार महेंद्र वाकलेकर नायब तहसीलदार प्रवीण चिडे अव्वल कारकून राजेश ढोबळे निशा सोयाम देवा थेटे अशासकीय सदस्य मिलिंद ताकसांडे रेखा घोडाम प्रमोद पिंपळशेंडे विलास आडे अनिल निवलकर अब्दुल हाफिज अब्दुल गणी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button