Amalner

रढावण येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू..!

रढावण येथे विहिरीत पाय घसरून पडल्याने 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू..!अमळनेर येथील रढावण येथील राकेश अधिकार पाटील वय 22 रा राजोरे ह्या तरुणाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे.राकेशच्या वडिलांची म्हणजे श्री अधिकार हिम्मत पाटील (गट क्रमांक ७९/१ व ७९/२)शेती असून शेतात विहीर आहे.राकेश शेतातील विहिरीत पडले असता सायंकाळी ६:३० च्या सुमारास मयत आढळून आले.
२-३ च्या सुमारास विहिरीत पडले असता ६-७ वाजता सापडले… विहीर ४५-५० फूट खोल होती आणि संपूर्ण पाणी असल्याने वेळ लागला शोधण्यास
तलाठी हर्षवर्धन मोरे आणि रढावण बीट चे हवालदार दुपार पासून प्रेत सापडे पर्यंत उपस्थित होते. मा. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी घटनास्थळी भेट दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button