Nandurbar

बेकायदेशीररीत्या घातक शस्त्र बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 1 लाख 28 हजार रुपये किमतीच्या 20 तलवारी जप्त

बेकायदेशीररीत्या घातक शस्त्र बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, 1 लाख 28 हजार रुपये किमतीच्या 20 तलवारी जप्त

फहिम शेख नंदुरबार

नंदुरबार : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक-2021 व नवरात्रौत्सव दरम्यान समाजकंटकांवर गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून मा. पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती पो निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रांव कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 04/10/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांन गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, धडगाव गावात मुख्य रस्त्यावर एक इसम हा त्याच्या शेती औजा विक्रीच्या दुकानात मानवी जिवितास घातक असलेल्या लोखंडी बनावटीच्या तलवारी बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगुन आहे अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच एक पथक तयार करुन त्यांना तात्काळ धडगांव येथे जावुन खात्री करुन पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचन दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगाव येथे जावुन खात्री केली असता धडगाव गावातील मुख्य रस्त्यावर एक इसम पत्र्याच्या टपरी बाहेर संशयास्पद हालचाली करतांना दिसुन आला म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यार ताब्यात घेवून त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्योच नांव संजय कागडा वळवी, वय ३८ वर्षे, रा.कार्त्र ता. धडगाव जि. नंदुरबार असे सांगितले, त्याच्या मालकीच्या टपरीची झडती घेतली असता तिथे 01 लाख 28 हजा रुपये किमंतीची 20 लहान मोठ्या धारदार तलवारी मिळुन आल्याने संजय कागडा वळवी याचे विरुध्द धडगांव पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असुन भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा नंदुरबार जिल्ह पोलीसांकडुन इशारा दिलेला आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, पोलीस अमंलदार अभिमन्यु गावीत दिपक न्हावी, रमेश साळुंके यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button