Patiyala

? Breaking News.. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण पवन गुप्ताची राष्ट्रपतींकडे दया याचिका…उद्याची फाशी पुन्हा लांबणीवर…

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण

पवन गुप्ताची राष्ट्रपतींकडे दया याचिका

उद्याची फाशी पुन्हा लांबणीवर…..

पटियाला

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारपैकी एक असलेल्या दोषी पवन गुप्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर राष्ट्रपतींचा निर्णय येईपर्यंत दोषींच्या फाशीवर दिल्लीतील पटीयाला हाऊस कोर्टाने स्थगिती दिली आहे.

इतर 3 आरोपींची दया याचिका राष्ट्रपतींनी यापूर्वीच फेटाळली असल्याने आता फक्त पवन गुप्ताच्या दया याचिकेवर निर्णय होणे बाकी आहे.

उद्या होणारी फाशी टळली आहे.

निर्भया प्रकरणातील चारही आरोपींच्या नावे उद्या (दि.3) रोजी सकाळी 6 वाजतासाठी ‘डेथ वॉरंट’ काढण्यात आले होते. मात्र त्यांना उद्या होणारी फाशी पुढे ढकलली आहे.

आरोपींकडून बचावाचे सर्व कायदेशीर पर्याय संपले असल्याने त्यांना उद्याच फाशी होईल, असा विश्वास निर्भयाच्या आईने व्यक्त केला होता.

दरम्यान, आज सकाळी दोषी पवन गुप्ता याची क्यूरेटीव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. तसेच पतियाला हाऊस कोर्टानेही डेथ वॉरन्ट रोखण्यासाठी दाखल केलेल्या अक्षय आणि पवनच्या याचिका फेटाळून लावल्या होत्या. मात्र राष्ट्रपतींकडे दया याचिकेचा निर्णय बाकी असल्याने या फाशीवर कोर्टाने तूर्तास स्थगिती दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पुढील आदेश येईपर्यंत तूर्तास तरी आरोपींची फाशी टळली आहे.

Leave a Reply

Back to top button