Rawer

? Big Breaking…बोरखेडा रावेर चौथ्या भावंडांच्या हत्येप्रकरणी १९ वर्षिय मुख्य आरोपीस अटक केर्हाळे तालुका रावेर येथून केली अटक

बोरखेडा रावेर चौथ्या भावंडांच्या हत्येप्रकरणी १९ वर्षिय मुख्य आरोपीस अटक …केर्हाळे तालुका रावेर येथून केली अटक

रावेर/ मुबारक तडवी

अधीक्षकांची पत्रकार परिषदेत माहिती

रावेर येथून जवळच असलेल्या बोरखेडा शेत शिवारात चार भावंडांची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आज मुख्य आरोपीला शास्त्रोक्त पुराव्याच्या आधारावर अटक करण्यात आली आहे . महेंद्र सिताराम बारेला ( वय १ ९ , रा . केन्हाळा ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .

याबाबत सविस्तर माहिती अशी की , पोलीस अधिक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी आज रावेर पोलीस स्थानकात एक पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली . त्यात त्यांनी सांगितले , रावेर शिवारात बोरखेडा रोड लगत शेतात दि . १६ ऑक्टोबर रोजी शेतातील शेतमजुराच्या घरात चार भावंडांचा निर्गुण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती . यासंदर्भात रावेर पोलीस स्थानकात ३०२ सह तपासादरम्यान ३७६ ( अ ) ४५२ लैंगिक अपराधा पासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१० , १२ अन्वये कलमांची वाढ करण्यात आली होती . सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस नाशिक ग्रामीण, धुळे, नंदुरबार जळगाव गुन्हा अन्वेषण सह रावेर पोलीस , एलसीबी , सायबर सेल अशा एकूण ७० पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमले होते . सदर गुन्ह्याच्या तपासात ५४ साक्षीदारांची सखोल चौकशी करून तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगावकडून मयताच्या शवविच्छेदनाचा प्राप्त अहवाल , न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नाशिककडून प्राप्त अहवाल , तांत्रिक व शास्त्रीय पुराव्याच्या आधारे तसेच घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हे हत्याकांड महेंद्र सिताराम बारेला यांनी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्याला आज पोलिसांनी अटक केली आहे . तर या गुन्ह्यातील इतर संशयितांची चौकशी सुरू असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button