Bhusawal

भुसावळ विभागातील “ह्या” 18 गाड्या रद्द..! पहा  रद्द गाड्या आणि तारीख..!

भुसावळ विभागातील “ह्या” 18 गाड्या रद्द..! पहा रद्द गाड्या आणि तारीख..!

जळगाव रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. कारण दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात चौथ्या लाइनच्या कनेक्टिव्हिटीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लाॅक घेतला आहे. यामुळे भुसावळ विभागातून बिलासपूर विभागात जाणाऱ्या तब्बल १८ गाड्या दि.२३ डिसेंबरपासून रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकावरून सुटणार नाही. त्यामुळे प्रवाशांचे आणि चाकरमान्यांचे हाल होऊ शकतात. या रद्द झालेल्या गाड्या कोणत्या आहेत, ते जाणून घ्या आणि तुमच्या प्रवासाची आखणी करता. अन्यथा हाल अटळ आहेत.

त्यात १२८७० हावडा-मुंबई २४ डिसेंबर, १२८६९ मुंबई-हावडा २६ डिसेंबर, १२८१२ हटिया-एलटीटी २४ व २५ डिसेंबर, २२८६६ पुरी-एलटीटी २८ डिसेंबर, एलटीटी-पुरी ३० डिसेंबर, १२८८० भुवनेश्वर-एलटीटी २३ व २७ डिसेंबर, एलटीटी-भुवनेश्वर २५ व २९ डिसेंबर, २२५१२ कामाख्य-एलटीटी २५ डिसेंबर, एलटीटी-कामाख्य २८ डिसेंबर, १२८१० हावडा-मुंबई २६ डिसेंबर, मुंबई-हावडा २८ डिसेंबर, १२१५१ एलटीटी-शालीमार एक्स्प्रेस २२, २३ व २९, तर शालिमार-एलटीटी ही गाडी २४, २५ व ३१ डिसेंबर, १२९४९ पाेरबंदर-सांत्रागाची २४ व सांत्रागाची ते पाेारबंदर गाडी २६ डिसेंबर, २२८९४ ही हावडा-साईनगर शिर्डी गाडी २३ व ३०, साईनगर शिर्डी ते हावरा एक्स्प्रेस २५ डिसेंबर आणि १ व २२ या दिवशी रद्द केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button