Nashik

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 67 उमेदवारांचे 146 अर्ज दाखल..

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 67 उमेदवारांचे 146 अर्ज दाखल..

सुनिल घुमरे नासिक विभागिय प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सहकारी तत्वावर सुरू असलेल्या जिल्ह्यातील एकमेव कादवा सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीत 17 जागांसाठी 67 उमेदवारांनी तब्बल 146 अर्ज दाखल केले असून सोमवार दि.7 रोजी छाननी होणार आहे. दरम्यान काल विरोधकांनी शक्तिप्रदर्शन करत सत्ताधाऱ्यांचे कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले होते त्यास आज सत्ताधारी गटाने ही जोरदार शक्तिप्रदर्शन करत आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. यंदाची निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्ह असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहे.
गुरुवारी विरोधी गटाने शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केल्यानंतर सभा घेतली होती त्यात ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे,शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील,भाजप तालुका प्रमुख नरेंद्र जाधव,सचिन बर्डे,माजी जीप शिवसेना गटनेते प्रवीण जाधव, भाऊलाल तांबडे,नितीन आहेर,संजय पाचोरकर यांनी सत्ताधाऱ्यांचे कारभारावर टीकास्त्र सोडत परिवर्तनाची हाक देत कारखाना कर्जबाजारी केल्याचा आरोप केला होता. विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी गटाने शक्तिप्रदर्शन करत आज अर्ज दाखल केले व संस्कृती लोंस येथे सभा घेतली.या सभेत चेअरमन श्रीराम शेटे यांनी विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत विरोधक सत्तेसाठी खोटा प्रचार करत असल्याचे सांगत आज जिल्ह्यात एकमेव कादवा सुरू असून उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देत आहे.जे विस्तारीकरनाला विरोध करत होते तेच ऊस उत्पादकांची दिशाभूल करत आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी संस्थेला बदनाम करु नका असे सांगत कादवा ची पूर्ण वाटचाल विषद करून कादवा विकासासाठी सर्वांनी पुन्हा साथ देण्याचे आवाहन शेटे यांनी केले. यावेळी बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील,विश्वासराव देशमुख,बोपेगाव सरपंच वसंत कावळे,माजी संचालक संजय पडोळ,टोपे,जाधव आदींची भाषणे होत त्यांनी विरोधकांचे टीकेचा समाचार घेतला. यावेळी काही सभासदांनी इथेनॉल प्रकल्पासाठी ठेविचे चेक चेअरमन श्रीराम शेटे यांचेकडे सुपूर्द केले. सूत्रसंचालन संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले यावेळी व्हा.चेअरमन माजी आमदार उत्तम बाबा भालेराव आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटच्या दिवशी यांनी अर्ज दाखल केले.मातेरेवाडी गट – अशोक संधान उत्तम पाटील, चींधू सोनवणे,निवृत्ती मातेरे, त्रंबक संधान दिंडोरी गट- बाळकृष्ण जाधव,दिनकर जाधव,शहाजी सोमवंशी,श्रीपत बोरस्ते,सुरेश देशमुख,प्रमोद देशमुख कसबे वणी गट रामदास पिंगळ,वसंत देशमुख,विशाल जाधव,राजेंद्र देशमुख,नरेंद्र जाधव,विश्वनाथ देशमुख,सचिन बर्डे
वडनेर भैरव – शिवाजी बस्ते,गोरख घुले सोसायटी गटात संपत वक्ते,अनुसूचित जाती जमाती गट- राजेंद्र गांगुर्डे,सागर पगारे महिला राखीव -चंद्रकला घडवजे ,शांताबाई पिंगळ,मनीषा देवरे,पूजा घडवजे,हिराबाई मातेरे, आशा वाघ,इतर मागासवर्ग – मधुकर गटकळ, प्रवीण जाधव, विजय वाघ,नकुल गटकळ,संगीता देशमुख
सोसायटी गट संपतराव वक्ते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button