Pandharpur

आंबे येथे वाळू उपशावर कारवाई,१४लाखांचा मुद्देमाल जप्त.

आंबे येथे वाळू उपशावर कारवाई,१४लाखांचा मुद्देमाल जप्त.

प्रतिनिधी
रफिक अत्तार

पंढरपूर सोलापूर ग्रामीण एल. सी. बी. ची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक यांचा वाळू माफियांना दणका मौजे आंबे ता. पंढरपूर येथील अवैध वाळू उपशावर कारवाई ०२ ट्रॅक्टर, ०२ यारी मशिन, १०० ब्रास वाळू साठयासह एकूण १४,००,००० रु. (१४ लाख रू.) किंमतीचा मुद्देमाल जप्त
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयातील अवैध वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सोलापूर जिल्हयात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी विशेष पथके तयार करून प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी
मिळाली की, मौने आंबेता. पंढरपूर येथून भिमा नदीपात्रातून काही इसम ट्रॅक्टर यारी मशीनव्दारे शासनाची परवानगी व रॉयल्टी नसतानाही चोरून वाळू काढत असल्याची बातमी मिळाली.पोनि सर्जेराव पाटील यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे कारवाई करणेकरता सफौ. ख्वाजा मुजावर व त्यांचे पथकास आदेश दिले. त्यावरून सफौ. ख्वाजा मुजावर व त्यांचे पथक मौजे आंबे ता. पंढरपूर येथे जावून बातमी प्रमाणे खात्री केली असता, भिमा नदीच्या पात्रातून ०२ यारी मशिन ट्रॅक्टरला जोडून वाळू काढत असल्याचे दिसून आले. तसेच त्याठिकाणी आजू बाजूला वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे दिसून आले. कारवाई करीता पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे एक पथक घटनास्थळी आल्यानंतर यारीजवळ जावून एक इसमास जागीच पकडले व काहीजण अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. तेथून ०२ ट्रॅक्टर, ०२ यारी मशिन, अंदाने १०० ब्रास वाळूचासाठा असा एकूण १४ लाख रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुरंन ७७/२०२२ भादविकाक ३७९, ३४ तसेच गौण
खनिज कायदा १९७८ चे कलम ४ (१), ४ (क), (१) प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्री. सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनानी गाडे, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, चालक समीर शेख तसेच पंढरपूर तालुका पोलीस ठाणेचे एक पथक यांनी बजावली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button