नांदेड

12 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस

12 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस

राजेश सोनुने

नांदेड : निवडणूक आयोगाच्या मीडिया सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीने नांदेड मधील 12 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. ज्या मेसेजसाठी अ‍ॅडमिनला नोटीस पाठवली आहे ते मेसेज अ‍ॅडमिनने पाठवले नव्हते. ते मेसेज त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या व्यकती व्यक्ती कडून पोस्ट करण्यात आले होते. दरम्यान निवडणूक आयोगाने मुंबईतील 4 फेसबुक पेजेसला देखील नोटीस जारी केली आहे. या सर्व ग्रुप्सवर आयोगाच्या परवानगीशिवाय उमेदवारांचा प्रचार करण्याचा आरोप आहे.

फेसबुक आणि ट्विटरवरही नियम लागू..

फेसबुक आणि ट्विटरवरही हा नियम लागू करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत केंब्रिज एनालिटिका घोटाळा झाल्यानंतर निवडणुकांदरम्यान सोशल मीडियाची भूमिका खूप महत्त्वाची ठरली आहे. त्याचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. नांदेड एमसीएमसी चे प्रमुख राजेंद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवाराला प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला प्रचार करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते. उमेदवाराने परवानगी न घेता कोणत्याही माध्यमातून प्रचार केल्यास त्यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येतो.

Leave a Reply

Back to top button