Mumbai

10/12 Exam Update: बारावी लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल..!जाणून घ्या काय आहे बदल..!

10/12 Exam Update: बारावी लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशत: बदल

तांत्रिक कारणांमुळे बदल.. बोर्ड

बारावीची परीक्षा मात्र वेळेतच सुरू होणार

५ आणि ७ मार्चच्या परीक्षा अनुक्रमे ५ आणि ७ एप्रिल रोजी होणार

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात मंडळाने अंशत: बदल केला आहे. असे असले तरी परीक्षा नियोजित वेळेतच सुरू होणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

बारावीच्या मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण (General), द्विलक्षी (Biofocal)आणि व्यावसायिक (M.C.V.C.) वेळापत्रकातील दिनांक ५ मार्च २०२२ आणि ७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा काही अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. या परीक्षा अनुक्रमे ५ एप्रिल २०२२ आणि ७ एप्रिल २०२२ या दिवशी होतील. परीक्षांच्या सत्रात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

परीक्षेच्या वेळापत्रकातील बदल पुढीलप्रमाणे असेल –

तारीख — सत्र — विषय — बदललेली तारीख

शनिवार ५ मार्च २०२२ — सकाळी १०.३० ते दुपारी २ — हिंदी (कोड ०४)– मंगळवार ५ एप्रिल २०२२

शनिवार ५ मार्च २०२२ — दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० — जर्मन, जपानी, चिनी, पर्शियन– मंगळवार ५ एप्रिल २०२२

सोमवार, ७ मार्च २०२२ — सकाळी १०.३० ते दुपारी २ — मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम तमिळ, तेलुगु, पंजाबी, बंगाली– गुरुवार, ७ एप्रिल २०२२

सोमवार, ७ मार्च २०२२ –दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० –उर्दू, फ्रेंच. स्पॅनिश, पाली — गुरुवार. ७ एप्रिल २०२२

बोर्डाने असे कळवले आहे की बारावीच्या लेखी परीक्षा आणि अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच दहावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील वरील अंशत: बदलाची सर्व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी तसेच पालक-विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button