Jalana

दलित वस्तीचा १ कोटी २८ लाखांचा निधी सुवर्ण वस्तीत वळविला. भाजपाने काँग्रेससोबत हाती मिळवनी करून निधी वळविल्याचा रिपब्लिकन सेनाचे युवा जिल्हाध्यक्ष राहूल खरात यांनी पत्रकार परिषदेत केला आरोप

दलित वस्तीचा १ कोटी २८ लाखांचा निधी सुवर्ण वस्तीत वळविला. भाजपाने काँग्रेससोबत हाती मिळवनी करून निधी वळविल्याचा रिपब्लिकन सेनाचे युवा जिल्हाध्यक्ष राहूल खरात यांनी पत्रकार परिषदेत केला आरोप

संजय कोल्हे जालना

जालना ; अंबड शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत अंबड नगर परिषद २०२०-२१ वर्षांसाठी
शहरात दलित वस्तीत करण्यांत येणाऱ्या कामांसाठी मंजुरी घेणे अपेक्षित असतांना भाजपाच्या नगराध्यक्ष संगीता कुचे तसेच काँग्रेसचे उपनगराध्यक्ष जाकेर डावरगावकर यांनी संगनमताने नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून दलित वस्तीऐवजी सुवर्ण वस्तीत कामे करण्याचा ठराव पारीत करून सुमारे १ कोटी २८ लाखांच्या कामास तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळविल्याचा खळबळजनक आरोप रिपब्लिकन सेनाचे युवा जिल्हाध्यक्ष राहूल खरात यांनी आज अंबड येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

शहरात दलित वस्तीतील रस्त्यांच्या दुरुस्ती तसेच रस्ते बनविण्यासाठी दि.१७.०३.२०२१ रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात ठराव क्र.१८ नुसार सुमारे १ कोटी २८ लाख रुपये खर्च करण्यासाठी ठराव घेण्यात आला होता. तसेच दि.३१ मार्च रोजी ज्या ६ रस्त्यांवर ही कामे करायची आहेत,त्या सर्व कामांसाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. मात्र ज्या ठिकाणी हे कामे होणार आहेत, तेथे दलित वस्तीच नाही. भाजपाच्या नगराध्यक्ष संगीता कुचे तसेच काँग्रेसचे उपनगराध्यक्ष जाकेर डावरगावकर यांनी संगनमत करून आलेला १ कोटी २८ लाख रुपयांचा निधी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सुवर्ण वस्तीत वळविल्याने दलित लोकांसह वस्तीवर होणारा अन्याय कदापी सहन केल्या जाणार नाही.शासनाच्या आदेश तसेच गाईडलाईन्सची बारकाईने पाहणी करण्यात यावी. तसेच ज्याठिकाणी कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे ते सर्व रस्ते तसेच कामे सुवर्ण भागांत होत असल्याने जिल्हाधिकारी साहेबानी त्वरित या ठिकाणी शिष्टमंडळ स्थापन करावे. तसेच दलित वस्तीच्या नावाखाली निधीचा होत असलेल्या भ्रष्टाचार जोपर्यंत थांबवणे गरजेचे आहे.

शहरातील दलित वस्तीसाठी आलेला निधी भाजप तसेच काँग्रेसच्या कटकारस्थानामुळे सुवर्ण वस्तीत वापरल्या जात आहे. दलित वस्तीला डावलून सुवर्ण वस्तीत होत असलेल्या कामांमुळे दलित वस्तीवर अन्याय होत आहे. आणि अन्यायाविरुद्ध माझा लढा देणार असल्याचे रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष राहुल खरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच संबंधित प्रशासकीय मान्यता रद्द करून आलेला निधी योग्य ठिकाणी न वापरल्यास नगरपरिषद अंबड समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देणार असल्याचे बोलले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button