Mumbai

?मोठी बातमी..काही तासांतच लॉक डाऊन..!राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय..!

?मोठी बातमी..काही तासांतच लॉक डाऊन..!राज्य सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय..!काही तासांतच लॉक डाऊन ची नियमावली जाहीर होण्याची शक्यता….!

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपूर्ण पडत आहेत.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

अनेक कठोर निर्णय घेऊनही गर्दी कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने कठोर नियम लावणे आवश्यक आहे.

याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सरकारमधील मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली.या बैठकीत महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबतची नियमावली काही तासातच सरकार जाहीर करणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिलेली आहे. तर उद्या रात्री ८ वाजल्यापासून हा कडक लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या बैठकीमध्ये केलेली आहे.

काही तासंपूर्वी गर्दी कमी करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या नुसार किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील.सकाळी 11 वाजता दुकाने बंद झाल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत या दुकानांद्वारे घरपोच सुविधेला मात्र परवानगी असेल असं सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील. या आदेशाची अंमलबजावणी 20 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button