Nagpur

? दंगल राजकारणाची…’ माझा पासपोर्ट जप्त झाला नाही, बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून राजकीय षडयंत्र ‘

? दंगल राजकारणाची…’ माझा पासपोर्ट जप्त झाला नाही, बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून राजकीय षडयंत्र ‘

नागपूर : माझ्यावर कुठलाही गंभीर आरोप नव्हता. २०१२ मध्ये किरकोळ चार केसेस होत्या. त्यासाठी आम्ही अ‌ॅफिडेविट देत नाही. फक्त सही देतो. त्यामुळे पासपोर्टसाठी मी फक्त सही दिली. त्यानंतर चौकशी करण्याचे पोलिसांचे काम होते. मात्र, त्यांनी ती केली की नाही याबाबत कुठलीही माहिती नाही. मात्र, माझा पासपोर्ट जप्त झालेला नाही, असे स्पष्टीकरण मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

विजय वडेट्टीवार यांचा आज पासपोर्ट जप्त झाल्याच्या चर्चा सुरू होत्या.
त्यावरच त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. २०१२मध्ये पासपोर्ट काढण्यात आला. त्यावेळी एजंट सही घेऊन गेला. त्यावेळी किरकोळ स्वरुपाच्या केसेस दाखल होत्या.

त्यानंतर भाजपच्या एका आमदाराने तक्रार दाखल केली होती. मला नोटीस आल्यानंतर मी स्वतः ईडी कार्यालयात जाऊन पासपोर्ट दिला. त्यावेळी त्यांना चौकशी करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर याठिकाणी चौकशी केली.

आता माझ्यावर कुठल्याही केसेस नाही. मी यापूर्वीच पासपोर्ट दिला. त्यामुळे आता पासपोर्ट जप्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. मी सतत ओबीसीच्या न्याय मागण्यांसाठी लढतोय. त्यामुळे विरोधक मला बदनाम करण्याचे राजकीय षडयंत्र रचत आहेत, असाही आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button