Akola

? मोठी बातमी : दादा म्हणाले, थांबा तुमचे धोतरच फेडतो; भाजप नेते लगेच घड्याळ बांधण्याच्या तयारीत

? मोठी बातमी : दादा म्हणाले, थांबा तुमचे धोतरच फेडतो; भाजप नेते लगेच घड्याळ बांधण्याच्या तयारीत

अकोले : जिल्हा बँकेमुळे वातावरण तापले आहे. कोणी कोणाला मदत केली. कोणी त्या मदतीची कशी परतफेड करणार याची चर्चा सुरू झाली आहे.
बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्याबाबत अजितदादांनी एक विधान केले होते. थांबा, तुमचे धोतरच फेडतो…असं भर सभेत दादा म्हणाले होते. त्या विधानाचीच चर्चा सध्या सुरू आहे.

गायकर हे भाजपात असले तरी त्यांच्या डोक्यात घड्याळाची सध्या टिकटिक वाजते आहे. त्यांना बँकेवर बिनविरोध जाण्यासाठी अर्थातच राष्ट्रवादीची मदत झाली आहे. ते पिचड समर्थक मानले जातात. ते जिकडे जातात, तिकडे गायकर जातात. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून ते भाजपत गेले होते.
आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.

जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आयोजित सत्काराला उत्तर देताना सीताराम गायकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे गायकर लवकरच राष्ट्रवादीत जाणार, अशी शक्‍यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

गायकर म्हणाले, की आपली ही शेवटची निवडणूक असून, चांगले करता आले नसेल मात्र वाईट कुणाचे केले नाही. मला सत्तेवर अजितदादा, मधुकर पिचड यांच्यामुळे संधी मिळाली. मी शरद पवारांच्या नावावर चाळीस वर्ष राजकारण केले, त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार हेच बिनविरोधचे शिल्पकार आहेत. मी त्यांचे आभार पुणे येथे जाऊन मानले.

कार्यक्रमात गायकर यांनी केवळ एकदाच माजी मंत्री पिचड यांचे नाव घेतले. मात्र, माजी आमदार वैभव पिचड यांचे नाव घेतले नाही. अगस्ती पूर्ण क्षमतेने चालविला जाईल, कर्जाची चिंता करू नका.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कारखान्याचे कार्यकारी संचालक यांचे सतत नाव घेऊन त्यांनी पिचड यांचे नाव घेण्यास टाळले. त्यामुळे अजित पवार व गायकर यांची “मॅच फिक्‍सिंग’ झाल्याचे चर्चा होत आहे.कोणत्याही क्षणी ते राष्ट्रवादीत डेरेदाखल झाल्यास आश्‍चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button