Belgaon

? Big Breaking शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी

? Big Breaking

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. 13 एप्रिल 2018 दिवशी बेळगाव जवळील येळ्ळूर या गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी भिडे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

आचारसंहिता लागू असतानाही भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आपल्या भाषणातून विधान केलं होतं, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संभाजी भिडे यांच्यासह नऊ जणांवर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र प्रत्येक कोर्टाच्या सुनावणीवेळी संभाजी भिडे गैरहजर राहिले त्यामुळे त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी करण्यात आले आहे, दरम्यान या संदर्भातली पुढील सुनावणी येत्या 24 मार्चला होणार आहे. या आधीही संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले होते.

Leave a Reply

Back to top button