Boliwood

?️ मर्शी I am still little…मीच अजून बाळ आहे बाळाला जन्म कसा देऊ? शॉर्ट फिल्म

?️ मर्शी I am still little…मीच अजून बाळ आहे बाळाला जन्म कसा देऊ? शॉर्ट फिल्म प्रा जयश्री दाभाडेआजच्या धकाधकीच्या काळात यथार्थ नसलेला feminism चा झेंडा कुठवर रोवायचा आपण ! असा प्रश्न लेखक रणजित गायकवाड यांना पडायचा.
एकतर्फी प्रेमात ऍसिड चा हल्ला असो किंवा पुरुषप्रधान संस्कृतीची शिकार या बाल विवाह सारख्या घाणेरड्या रूढी परंपरा या साऱ्यांचा भार स्त्रीलाच तोलावा लागतो.मुलीचे लग्न करणे म्हणजे प्रपंच नेटका असे म्हणणारे लोक बालवयात मुलींची लग्न करून समाजात थाटात फिरतात.मुळात यांची विचार श्रेणी केकताड सारखी असते,मग हे बालवयात नाजूक कळ्यांना खुडून चऱ्याट सारखं वागत असतात.?️ मर्शी I Am Still Little...मीच अजून बाळ आहे बाळाला जन्म कसा देऊ? शॉर्ट फिल्मएखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर अख्खा देश पेटून उठतो,समाज पेटतो आणि हो पेटायलाच पाहिजे!
परंतु कमी वयात लग्नाचा बार उडवून मस्तावल पणे फिरणारा बाप व त्या अल्पवयीन मुलीचा नवरा हे दोघी मिळून तिच्यावर मानसिक व शारीरिक बलात्कार करत असतात.यांच करायचं काय?या समाज मान्य बलात्काराचे काय? मीच अजून बाळ आहे मग बाळाला कसा जन्म देऊ? त्या निरागस मुलीने केलेला दांभिक प्रश्नाचे उत्तर देणार कोण?
असे असंख्य प्रश्न रणजित गायकवाड यांना पडायचे!
हा सर्व विषय समोर ठेऊन बालविवाह सारख्या रुढी परंपरा बंद व्हाव्यात या करिता श्री छत्रपती शिवाजी महाराज एंटरटेनमेंट प्रॉडक्शन हाऊस व श्री प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली“मर्शी – I’m still little”
ही मार्मिक शॉर्ट फिल्म बनवली आहे.या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन परकीया या चित्रपटाचे मुख्य अभिनेते चेतन कुमार लमाण यांनी केले असून कमीत कमी वेळा मध्ये किती छान प्रकारे या विषयाची मांडणी करता येईल ह्याचा ही अभ्यास दिग्दर्शक चेतन कुमार यांनी केला असून हा विषय त्यांनी फक्त 14 मिनिट मध्ये मांडला असून, या शॉर्ट फिल्म चे छायांकन अभिजीत मोहिते आणि विराज कदम यांनी केले असून सह छायांकन विजय मोरे यांनी केले आहे,संकलन, पार्श्वसंगीत ओंकार बाबर यांनी केले आहे.व याची निर्मिती विराज कदम यांनी केली आहे, विराज कदम यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच लघुचित्रपट आहे आणि
कलाकार खलीलप्रमाणे:-
Srushti Deshmane
Sakshi deshmane
Prashant Bodgire
Dhanashree dhaingade
Sushmita Buchade
Balaso patil
Rekha Akale
Amol kumbhar
Priya chanadanshive
Rajendra virkaydeछत्रपती शिवाजी महाराज एंटरटेनमेंट
संस्थापक…।
मो.7218657980

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button