Maharashtra

सावदा येथील ॲंग्लो उर्दू शाळेची शैक्षणिक संस्था इत्तेहाद एज्युकेशनच्या संचलकांमध्ये फुट?

सावदा येथील ॲंग्लो उर्दू शाळेची शैक्षणिक संस्था इत्तेहाद एज्युकेशनच्या संचलकांमध्ये फुट?सदर प्रकरणी भुसावळ न.पा.उर्दु शाळेतील शिक्षक तथा सावदा ॲंग्लो उर्दू हायस्कूलचे चेयरमन शेख इक्बाल शेख कादर मन्यार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी फोन न उचलून प्रतिसाद दिलेला नाही. “
—————————————-सावदा प्रतिनिधी युसूफ शाहसावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील ॲंग्लो उर्दू हायस्कूल या शाळेची शैक्षणिक संस्था इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या शेडूल १ वर असलेल्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सह शाळा समिती चेयरमन व एक सदस्य यांच्या हमकरे सो कायदा आणि मनमानी विरुद्ध संस्थाचे सचिव सह ६ अशा एकूण ७ सदस्यांनी आपला गट तयार केल्याची माहिती एका संचालकाने दिली. असून लवकरच ते सामुहिकरित्या कायदेशीर मार्गाने आपली पुढील कारवाई देखील करणार तरी यावरून दिसून येते की,उरलेले सदरील संस्थाचे प्रमुख संचालक अल्पमतात आले असून संस्था मध्ये भविष्यात देखील आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी एक सदस्य गुपचूपरित्य बहुमतात असलेल्या गटाच्या संपर्कात असल्याचे सुद्धा बहुमतात असलेल्या गटाच्या संचालकांकडून सांगण्यात आले.तसेच सदरील ॲंग्लो उर्दू हायस्कूल या शाळेची व इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीची स्थापना पासून सरासरी गेल्या ३० वर्षाची पार्श्वभूमीचे अवलोकन केले.तर सदर अनुदानित शाळा मुस्लिम पंचायतच्या जागेवर एका कबाड खान्या सारख्या खोल्यात सुरू होती.सर्दी,उन्हाळा व पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थ्यां व शाळा कर्मचाऱ्यांची होत असलेली दयनीय अवस्थाची कल्पना न करणेच बरे राहील.या सर्व दुर्दशाचे साक्षीदार शहरवासी व पालक सुद्धा आहे.हे विसरून चालणार नाही.तरी सुद्धा ३० वर्षात शाळासाठी संस्था चालकांना अध्यावत इमारत का उभारता आली नाही.? मांजर कुठे व कशी आडवी आली? या प्रश्नाचे उत्तर ते ठामपणे कदाचित देऊ शकत नाही.परिणामी सन २०१९-२० मध्ये इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळात जादूईरित्या फेरबदल होवून थेट जुन्या दोन संचालकास बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.व त्यांच्या जागी घेण्यात आलेले दोन नवीन संचालकांनी सरासरी ३ वर्षाच्या कालखंडात शाळेची नवीन अध्यावत इमारत बांधून शहरवासीयांना आश्चर्यचकित केले.मात्र यानंतर अंडा एैवजी कोमडी मारण्याची स्पर्धा सुरू झाली.व मुळे यांच्यात देखील आता फुट पडल्याची माहिती बाहेर आली असून सध्याचे शेडूल १ वर असलेले अध्यक्ष सोबत फक्त दोन सदस्य व सचिव सोबत ६ सदस्य असे संख्याबळ असल्याचे नुकतेच एका संचालकाने सांगितले.तरी भविष्यात याचे काय चांगले किंवा वाईट परिणाम समोर येईल हे येणारा वेळच सांगतील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button