चांपा/नागपूर

सरपंचांच्या प्रयत्नाने चांपा गावाला मिळणार नालंदा वाचनालय २५वर्षांपूर्वीच्या इमारतीत चांपा गावाला मिळाले नालंदा वाचनालय व व्यायामशाळा

सरपंचांच्या प्रयत्नाने चांपा गावाला मिळणार नालंदा वाचनालय

२५वर्षांपूर्वीच्या इमारतीत चांपा गावाला मिळाले नालंदा वाचनालय व व्यायामशाळा

सरपंचांच्या प्रयत्नाने चांपा गावाला मिळणार नालंदा वाचनालय २५वर्षांपूर्वीच्या इमारतीत चांपा गावाला मिळाले नालंदा वाचनालय व व्यायामशाळा

 
चांपा :-अनिल पवार
सरपंच अतिश पवार यांचे शिक्षण :-बि.ए ,डि.एड ,  एम.ए इतिहास , बि .एड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असल्याने सर्व शिक्षण मामा  (बबन गोरामन) यांच्या मार्गदर्शनाखाली गावात मामानी आम्हांला शिक्षणाचे महत्व पटवून दिले ,गरिब असल्यामुळे आम्हांला शिक्षण घेतांना मोठया अडचणीचा सामना करावा लागला .आम्ही दोन वर्षाचे असतांना वडीलाचा
म्रुत्यु झाल्याने , मामा बबन गोरामन यांची आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्याने मामांनी आमचे पालनपोषण केले. मामाच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अतिश पवार यांनी वर्ग दहावी पर्यन्तचे शिक्षण  उमरेड तालुक्यातील उदासा गुरुकुल आदिवासी आश्रमशाळेत घेतले. मामांनी आम्हांला शिक्षणाची ओड लावली ,व्यसनाधिंन होऊ दिले नाही . आम्ही पदवीधर पर्यंतचे शिक्षणासाठी मित्रांच्या पुस्तकातून पुढचं शिक्षण घेत प्रवास सुरू होता .
शाळेत जात असतांना फाटके रजिस्टर बुक पुस्तकातुन आम्हांला शिक्षणाची ओड लागली  असून आमच्यावरची परिस्थिती कोणत्याही विद्यार्थांना व कोणावरही येऊ नये याची काळजी घेत असतांना  नेहमी चांपा गावातील गरिब गरजू विद्यार्थांचे शिक्षणास कोणत्याही प्रकारचे अडथळा येऊ नये म्हणून गावातच या गरजूं होतकरू विद्यार्थांकरिता नालंदा  वाचनालय सुरू करण्याचे संकल्प घेतले असून सरपंचाच्या प्रयत्नाने गरिब होतकरू विद्यार्थांना शिष्यवृत्तीसाठी लागणारे जातीचे प्रमाणपत्र , उत्पन्न प्रमाणपत्र , बँक पासबुक करीता राजस्व अभियानांतर्गत  आवश्यक कागदोपत्री निशुल्क वाटप करण्यात आले .
गावातल्या गरीब होतकरू विद्यार्थांना स्पर्धेच्या युगात आपले भवितव्य घडवून आणण्यास सरपंचानी एक पाऊल पूड आणत , २५वर्षांपूर्वी जुन्या इमारतीला श्रमदानातुन गावातल्या युवक वर्ग व विद्यार्थ्यांचा मदतीने श्रमदान व लोकवर्गणीतुन  वाचनालय व व्यायामशाळा सुरू करण्यासाठी सरपंच अतिश पवार यांना यश आले आहेत .वाचनालयाचे काम प्रगतीपथावर असून लवकरच गावातील युवकवर्ग व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना नालंदा वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षाचे पुस्तक सोबतच आठवड्यात एकदा स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन होणार आहेत .
वाचनालय करीता  पुस्तक ,  खुर्ची , व टेबलची आवश्यकता आहेत क्रुपया या गरीब होतकरू विद्यार्थांना नालंदा वाचनालयाच्या माध्यमातून स्पर्धेच्या युगात यश मिळवता येईल , एखादा गरीब होतकरू विद्यार्थीचे अधिकारी बनण्याचे स्वप्न आपल्या मदतीने पूर्ण होईल , करीता नालंदा वाचनालयासाठी  आवश्यक असणारे साहित्य दान करावे ही नम्रपणे विनंती 
सरपंच (अतिश पवार )
आपण नालंदा वाचनालयासाठी आवश्यक साहित्य  खालील पत्यावर पाठवू शकता ! 
नालंदा वाचनालय मु .पो चांपा ता .उमरेड .जि .नागपुर 
संपर्क क्र .7888259211,
*टीप :-नालंदा वाचनालय चांपा करीता दानकर्ते :- नाथे पब्लिकेशनचे संस्थापक मा .संजय नाथे सर व उमरेडचे तहसिलदार प्रमोद कदम यांनी पुस्तकांची मदत केली आहे*.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button