रावेर

रंगपंचमी व्याख्यान मालेचे उद्घाटन व प्रथम पुष्प गुंफले कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी

रंगपंचमी व्याख्यान मालेचे उद्घाटन व प्रथम पुष्प गुंफले कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी

विलास ताठे

रावेर ता . १६ देशात आराजकता पसरवून भारतातील संसदिय लोकशाही उखडून टाकण्याचा प्रयत्न माओवादी संघटने कडून होत आहे . मात्र शहरातील पोलीस यंत्रणे कूडून त्यांचा डाव हाणून पाडला जात आहे . शहरातील माओवाद जंगलातील माओवादापेक्षा घातक असल्याचे प्रतिपादन कॅप्टन श्रीमती ‘ स्मिता गायकवाड यांनी येथे बोलतांना व्यक्त केले .
येथील सरदार जी जी हायस्कुल च्या रंगमंचावर
भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फौंडेशन जळगाव आयोजित रंगपंचमी व्याख्यान मालेचे उद्घाटन व प्रथम पुष्प गुंफतांना कॅप्टन स्मिता गायकवाड बोलत होत्या
यावेळी तहसिलदार उषाराणी देवगुणे,रावेर शिक्षण संवर्धक संघाचे चेअरमन प्रकाश मुजुमदार,विश्वस्त डॉ .राजेंद्र आठवले, अध्यक्ष विठोबा पाटील, सचिव अनिल महाजन, सदस्य हेमेंन्द्र नगरिया आदि उपस्थित होते
. त्या पुढे म्हणाल्या की १९६७ मध्ये चीन मधील माओ स्टॅॅलीन यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या लोकांनी माओवाद भारतात आणला . स्टॅॅलीनच्या चीनने कधीचाच माओवाद मागे सोडला आहे.माओवाद आणि नक्षलवाद वेगळ्या संघटना नसून फक्त शब्दांचा घोळ आहे.१९६७ मध्ये जो उठाव झाला,तो नक्षलवादी नावाच्या गावात झाला . यामुळे नक्षलवाद हे नाव पुढे आले . या संघटनेने त्यांचे वेगवेळ्या ठिकाणी तळ निर्माण केले व शहरी माओवाद आणला असल्याचे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

१९६७ मध्ये नक्षलवादी गावात उठाव झाला,त्याला माओवाद्यांनी क्रांती म्हटले आहे . माओवाद्यांचा उद्देश सत्ता काबीज करण्याचा आहे . ती भारतात अस्तित्वात असणाऱ्या लोकशाहीने तत्वाने नाही तर बंदुकीच्या जोरावर करायची . भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काही दिवसापूर्वी फोर्थ जनरेशन वॉरफेअर बद्दल मत व्यक्त केले .यात शत्रू कोण आहे हे समजणे कठीण असते .युद्ध आणि राजकारण,लढाऊ आणि नागरिक यांच्यातला फरक कळत नाही.कळत-नकळत यात लोकांना सामील करून घेतले जाते.त्यामुळे असे शत्रू हे जंगलात राहणाऱ्या शत्रूपेक्षाही भयंकर असल्याचे त्यांनी सांगितले.हि माहिती देतांना त्यांनी जी.एन.साईबाबा,श्रीधन श्रीनिवासन,सुजल अब्राहम यांचे उदाहरणे देवून शहरी माओवाद स्पष्ट करून दिला.त्यांनी माओवाद्यांच्या १४ निरनिराळ्या संघटना व ७ फ्रंट असल्याची माहिती दिली.तर १९६७ मध्ये माओवाद्यांनी आपले बस्तान बसवून २००२ पर्यंत ४० निरनिराळ्या तुकड्या निर्माण केल्या .भारत बलाढ्य देश आहे,त्यामुळे तुकड्यातून लढणे शक्य नाही,यामळे ते एकत्र येत सीपीआंय माओवादी संघटना स्थापन केली.भारताविरुद्ध लढाईला त्यांनी क्रांती म्हटले आहे . दीर्घकालीन युद्धाने जिंकण्यासाठी त्यांची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.स्वागत श्रीमती कांता बोरा, प्रास्ताविक व परिचय विश्वस्त डॉ . राजेंद्र आठवले, सुत्रसंचालन अध्यक्ष अनिल महाजन, आभार कैलास वानखेडे यांनी मानले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button