Parbhani

? आताची मोठी बातमी : आठ लाचखोर पोलीस कर्मचारी निलंबित, जिल्हा पोलिस अधीक्षक यांची कडक कारवाई

? आताची मोठी बातमी : आठ लाचखोर पोलीस कर्मचारी निलंबित, जिल्हा पोलिस अधीक्षकाची कडक कारवाई

परभणी : कर्तव्यात बेशिस्त, बेजबाबदार, नैतिक अधःपतनाचे वर्तन तसेच लाचखोर वृत्तीचे वर्तन करणाऱ्या आठ पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी मंगळवारी निलंबित केले. अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांशी संबंध साधत आर्थिक फायदा करून घेणे, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून अवैधरीत्या पैसे वसूल करत सर्वसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबित केले.
यामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यातील कर्मचारी वैजनाथ आदोडे, मो. मोसीन, मो. मोईन, गजानन जंत्रे, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सूर्यकांत सातपुते, विठ्ठल कटारे, नानलपेठ पोलीस ठाण्यातील सचिन राखोंडे, सतीश कांबळे, कृष्णा शिंदे यांचा समावेश आहे.
गैरप्रकारांना आळा घालणे अपेक्षित असतानाही अवैध व्यावसायिकांशी संबंध ठेवत त्यांच्याकडून पैसे वसूल करत होते. या अवैध धंद्यांना चालना देण्याचा दोष या सर्वांनी केला असल्याचेही पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी निलंबनाच्या आदेशात नमूद केले आहे.

Leave a Reply

Back to top button