नांदेड

बिलोली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

बिलोली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष

जिल्हा प्रतिनिधी नांदेड वैभव घाटे

बिलोली तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट दोन वर्षांपासून परिसरातील ग्रामीण भागात झालेला आसुन कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालेला आसुन

ग्रामिण भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत कोणती पदवी ना कुठली शाश्वती नसतानाही

दोन वर्षांपासून परिसरातील गंजगाव माचनुर कार्ला बडुर नागणी इत्यादी भागात कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसणाऱ्या बंगाली बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांनी स्थानिक भोळ्याभाबड्या गरिब बांधवाची आर्थिक लूट करण्यासोबतच त्यांच्या जिविताशीही खेळ चालविला आहे. जास्त भावाने स्वत: जवळचे गोळ्या औषध व सलाईन देवून गावातील व्यक्तीची फसवणूक करुन पुरुष गब्बर बनले आहेत. सद्या वातावरणा मध्ये बदल असून काही अती तापमान तर कधी केवळ पावसाचे वातावरण अशा परिस्थितीत हवामानात झालेल्या बदलाने अतिसार, मलेरिया, यासारखे आजार दिसू लागले आहेत .ग्रामीण नांगरिकांना बिलोली कुंडलवाडी बोधन हे अंतर लांब असल्याने आणि आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ते जवळच्याच झोलाछाप बोगस डॉक्टरकडून उपचार करून घेतात परंतु या डॉक्टरकडे कोणत्याच प्रकारची पदवी (डिग्री) किंवा उपचाराचे विधीवत प्रशिक्षण नसतानाही ते सलाईन आणि जड इंजेक्शनचा वापर करून रुग्णांची फसवणूक करीत आहे. यामध्ये दरवर्षी कितीतरी रुग्णांना आपला जिव गमवावा लागतो.

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी बोगस डॉक्टरवर कार्यवाही करण्याचे आदेश देत नाही तो पर्यत आसाच गोरखधंदा चालुच राहातो हा प्रकार धक्कादायक असुन याकडे वरिष्ठाने लक्ष घालुन बोगस डाँक्टरावर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांची आहे .

Leave a Reply

Back to top button