उस्मानाबाद

प्लास्टिक मुक्ती व स्वच्छता करून मतदान जागृती करा—म.गांधीजींची १५०वी जयंती साजरी करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

प्लास्टिक मुक्ती व स्वच्छता करून मतदान जागृती करा—म.गांधीजींची १५०वी जयंती साजरी करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख 

प्लास्टिक मुक्ती व स्वच्छता करून मतदान जागृती करा—म.गांधीजींची १५०वी जयंती साजरी करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख

उस्मानाबाद प्रतिनिधी
आज म.गांधीजी यांची१५०जयंती व माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्ञी यांची जयंती साजरी करतांना आजच्या विद्यार्थी.शिक्षकांनी प्लास्टिक बंदीची अंमलबजावनी करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये व इतरांनाही करू देऊ नये तसेच आठवड्यातून दोन तास आपल्या परिसरात स्वच्छता करावी व सजग लोकशाही घडवण्यासाठी नव मतदार वाढवण्यासाठी व मतदान जागृती करावी असे आहावन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात स्वच्छतेतून म.गांधीजी यांची जयंती साजरी करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केले आहे. महाविद्यालयात आज २आॅक्टोंबर म.गांधीजी यांची १५०वी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी म.गांधीजी व लाल बहाद्दुर शास्ञी यांच्या प्रतिमेचे पूजन केले डाॅ.डी.वाय इंगळे यांनी शिक्षणमहर्षी डाॅ.बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.या प्रसंगी म.गांधीजी व लाल बहाद्दुर शांस्ञी यांच्या कार्यावर प्रा.शिवाजी गायकवाड व्याख्यान देतांना म्हणाले की,म.गांधी यांचे भारत देशाच्या जडणघडणीत अहिंसेचे मार्गाने केलेले योगदान महत्वपुर्ण आहे.आहे त्यांची चले जाव ची चळवळ इंग्रजांना हादरवणारी होती.आज गांधीजींच्या शांततेची गरज केवळ भारतालाच नव्हे तर जगालाही आहे.आजच्या वातावरणात गांधीजीच्या विचाराशीवाय पर्याय नाही.लाल बहाद्दुर शास्ञी यांची जय जवान जय किसान ही घोषणा सगळ्यांना माहितच आहे.आज या दोनही महापुरूषांच्या विचाराची गरज आहे.
आजच गांधीजींची जयंती साजरी करतांना विद्यार्थ्यांच्यात मतदार जागृती व्हावी यासाठी राज्यशास्ञ विभागातील प्रा.डाॅ.नितीन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मागर्गदर्शन करतांना सांगितले की,आज आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी व चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे व आज आपल्या महाविद्यालयातील ज्यांना आठरा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांनी मतदार नोंदणी करून टक्केवारी वाढवावी असे सांगितले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थीनींना,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सेवक यांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली प्रकल्पअधिकारी प्रा.माधव उगीले यांनी स्वच्छतेची शपथ दिली.व लागलीच सगळ्यांनीच महाविद्यालयाच्या परिसरात प्रत्यक्ष एक तासभर  स्वच्छता करून म.गांधीजींची १५०वी जयंती श्रमदान करून साजरी केली.त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर स्वच्छतेने ऊजळून निघाला.या प्रसंगी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील विद्यार्थिनींनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचा नारा दिला व प्रत्यक्ष कापडी व कागदांच्या पिशव्या तयार करून स्टाॅल लावला त्यांना मागर्गदर्शन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख व प्रा.भाग्यश्री गोंदकर यांनी मार्गदर्शन केले होते .या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर,प्रभारी प्राचार्य प्रा.बबन सुर्यवंशी,स्टाफ सेक्रेटरी प्रा.अतुल देशमुख,डाॅ.केशव क्षीरसागर,प्रा.श्रीराम नागरगोजे,प्रा.मोहन राठोड,प्रा.सौ.स्वाती बैनवाड,प्रा.डाॅ.विद्या देशमुख,प्रा.संदिप देशमुख,प्रा.राजा जगताप ,प्रा.डी.एम.शिंदे उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button