उस्मानाबाद

प्रा.राजा जगताप यांच्या गाव तेथे बुध्द विहार कादंबरीला वाढती मागणी

प्रा.राजा जगताप यांच्या गाव तेथे बुध्द विहार कादंबरीला वाढती मागणी

उस्मानाबाद प्रतिनिधी राजू जगताप
टाकळी (बें)ता.उस्मानाबाद येथील व रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विभागात कार्यरत असणारे प्रा.राजा जगताप यांनी लिहीलेली व नुकतिच उस्मानाबाद येथे ८सप्टेंबरला ज्येष्ठ साहित्यिक मा.योगीराज वाघमारे,भंतेजी सुमेध श्रावस्ती बुध्द विहार खरोसा यांचे हस्ते अध्यक्ष प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख व राम गायकवाड जालना,कवी माधव जाधव नांदेड,प्रा.शिवराज गोपाळे रत्नागिरी,डाॅ.शिवाजीराव देशमुख तुळजापूर,प्रा डाॅ.रत्नाकर मस्के यांचे उपस्थित प्रकाशित झालेली व श्रावस्ती बुध्द विहार खरोसा बुध्द लेणी परिसर, ता.औसा,जि.लातूर २०१९ च्या,कादंबरीसाठीच्या विशेष पुरस्काराने सन्मानित झालेल्या या. कादंबरीला उस्मानाबाद व लातूर परिसरात आणि गावखेड्यात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.डाॅ.बाबासाहे आंबेडकरांना अपेक्षित असणारा बदलत्या काळातील युवक गरिबीतून शिक्षण घेतांनाच तो गाव तेथे बुध्द विहार चळवळीसाठी कसा वाहून घेतो व तो हे काम करतांनाच पोलीस निरीक्षक कसा होतो हा या कादंबरीचा विषय असल्याने आंबेडकरी तरूण व समाजातील वाचकांना ही कादंबरी खुपच आवडल्याने या कादंबरीची चर्चा परिसरात होत आहे.एका महिण्यातच पहीली आवृत्ती संपत आली आहे.या कादंबरीचे लेखक प्रा.राजा जगताप यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Back to top button