धरणगाव/जळगांव

कंडारी व दोनगावं येथे ३० लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न ! ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून व्यायाम शाळा,कब्रस्थानाला संरक्षण भिंत मंजूर !

कंडारी व दोनगावं येथे ३० लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न !

ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून  व्यायाम शाळा,कब्रस्थानाला संरक्षण भिंत  मंजूर !

कंडारी व दोनगावं येथे ३० लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न ! ना.गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून व्यायाम शाळा,कब्रस्थानाला संरक्षण भिंत मंजूर !

नितीन माळे
धरणगाव/जळगाव दि.१९ : – सहकार राज्यमंत्री  तथा शिवसेनेचे उपनेते  ना. गुलाबराव पाटील  यांच्या  प्रयत्नातून  ३० लाखाच्या निधीतून जळगांव तालुक्यातील कंडारी येथे मुस्लिम कब्रस्थानाच्या  संरक्षण भिंतीचे तसेच धरणगाव तालुक्यातील दोनगाव बु.येथिल   व्यायाम शाळेचे व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामांचे  भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील ,उप जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृ.ऊ. बा. समितीचे सभापती कैलास चौधरी हे होते.
३० लाख निधीतील या कामांचे झाले भूमिपूजन !
धरणगाव तालुक्यातील दोनगाव बुद्रुक येथे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून व्यायाम शाळेसाठी ९ लक्ष, पेविंग ब्लॉक बसवणे ५ लक्ष तसेच दोनगाव खुर्द येथे पेविंग ब्लॉक बसवणे ५ लक्ष व रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी ३ लक्ष तसेच कंडारी तालुका जळगाव येथे आमदार निधीतून मुस्लिम कब्रस्तानाला ५ लक्ष व मूलभूत सुविधेतुन काँक्रिटीकरण साठी ३ लक्ष अशा एकूण ३० लाखाच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जि प सदस्य प्रतापराव पाटील, कृ ऊ बा समितीचे सभापती कैलास चौधरी, उप जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, यांच्या हस्ते   करण्यात आले.
जनसामान्यांचे विकास महर्षी म्हणजे “गुलाब भाऊ”
– मुस्लिम पंचकमेटी 
कंडारी तालुका जळगाव येथील मुस्लिम पंच कमिटीच्या मागणीनुसार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार निधीतून येथील मुस्लिम कब्रस्तानाला ५  लाखाचा निधीतून काम मंजुर केले. या कामाचे भूमिपूजन जि. प. सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी येथील मुस्लिम पंच कमिटीच्या  ज्येष्ठांनी सांगितले की,जळगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात गुलाब भाऊंनी जनसामान्यांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध विकास  कामांकरिता कोट्यवधींचा निधी खेचून आणून विकास कामे केली. त्यामुळे गुलाब भाऊ म्हणजे जनसामान्यांचे विकास महर्षी आहेत  अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.
या वेळी शिवसेनेचे  रावसाहेब पाटील,  किशोर पाटील, संजय पाटील, राजेंद्र चव्हाण, संजय घुगे , युवासेनेचे  शिवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास चौधरी, विजय लाड, नंदूभाऊ देशमुख , जनार्दन पाटील, देविदास कोळी , कंडारी येथील प्रदीप सुर्वे,सरपंच नथाबाई गवळे, राजू शेख , हुशेन शाह, मेहबूब शाह, इम्तियाज इतबार, सलमान हुशेंन , दोनगावचे अविनाश  पाटील, माजी सरपंच तुकाराम पाटील, राजकुमार जाधव, भारमल पाटील, सरपंच कमलबाई मरसाळे, रामकृष्ण आहिरे, शिवाजी शिंदे, अशोक पाटील, वसंत पाटील,  भगवान पाटील, आर के पाटील, पाटील, शांताराम पाटील , बबन पाटील, बळीराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रा.पं. सदस्य किशोर पाटील यांनी केले तर आभार नंदूआबा देशमुख यांनी मानले.

Leave a Reply

Back to top button