Daund

एकाच कुटुंबातील चार जणांसह एसआरपीतील तीन जवान दौडं मध्येकोरोना बाधित…

?️ एकाच कुटुंबातील चार जणांसह एसआरपीतील तीन जवान दौडं मध्येकोरोना बाधित…

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :दौंड शहरामध्ये सद्या कोरोना बाधित रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून दौंड येथील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज दौंड शहरातील एकाच कुटुंबातील चार सदस्यांना कोरोनाची बाधा झाली असून राज्य राखीव दलातील तीन जवान देखिल कोरोना पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.

कोरोना विषाणू दौंडकरांची पाठ सोडत नसून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कांत आलेल्या ५० जणांची कोरोना विषाणूची तपासणी करण्यात आली असून यातील ७ जणांचा वैद्यकीय अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील ४५ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय मुलगी व १४ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

मुंबई येथे बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव दलातील तीन जवान देखील कोरोना पॉजिटीव्ह निघाल्याने दौंडकरांची चिंता वाढतच चालली आहे.

Leave a Reply

Back to top button