Pune

?आताची मोठी बातमी..राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना ईडी ने केली अटक; पुण्यातील शिवाजीराव भोसलेसहकारी बँकमध्ये तीनशे कोटींची बेनामी कर्ज घोटाळा

?आताची मोठी बातमी..राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना ईडी ने केली अटक; पुण्यातील शिवाजीराव भोसलेसहकारी बँकमध्ये तीनशे कोटींची बेनामी कर्ज घोटाळा

पुणे : शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाकडून (इडी) अटक करण्यात अ ईडीकडून अटक करण्यात आली आहे. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अनिल भोसले यांना अटक केली आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार आहेत.
मनी लॉँड्रींगच्या केसमध्ये न्यायालयाकडून वॉरंट मिळाल्यावर भोसले यांना अटक करण्यात आली. बँकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आमदार अनिल भोसलेंसह चौघांनाअटक केली होती.
सध्या अनिल भोसले हे पुण्यातील येरवडा कारागृहात. यानंतर आता शिवाजीराव भोसले बँकेतील या घोटाळ्याबाबत ईडीने गुन्हा दाखल केला आहे. सध्या ईडीकडून याप्रकरणाचा तपास केला जात आहे. या तपासासाठी अनिल भोसले यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे विधानपरिषदेवरील आमदार अनिल भोसले हे शिवाजी भोसले सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांच्यासह बँकेचे दुसरे संचालक सूयार्जी जाधव, सीईओ तानाजी पडवळ, चीफ अकाऊंटंट शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे.अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आॅडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खºया दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते.
उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भोसले यांच्याबरोबरच तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष देशमुख हे भोसले यांचे नातेवाईक असून त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button