India

?निवडणूक रणधुमाळी… ममता बॅनर्जी यांच्या विजयावरून गोंधळ..!हा तर रडी चा डाव..!

?निवडणूक रणधुमाळी… ममता बॅनर्जी यांच्या विजयावरून गोंधळ..!हा तर रडी चा डाव..!

पश्चिम बंगालमध्ये 200 हून अधिक जागांवर विजय मिळवत ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधलीय. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातील म्हणजेच नंदीग्रामच्या निकालावरून मात्र गोंधळ उडाला आहे.
सुरुवातीला ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये 1200 मतांनी विजय झाल्याची बातमी समोर आली. एएनआय वृत्तसंस्थेननं या संदर्भात ट्वीट केलं की, “भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांचा पराभव झाला असून ममता बॅनर्जी यांचा 1200 मतांनी विजय झाला आहे.”
दुसरीकडे भाजपने मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झाल्याचा दावा केला आहे.तर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरची सध्याची आकडेवारी पाहिल्यास, नंदीग्राम मतदारसंघात आतापर्यंत शुभेंदू अधिकारी यांना 82 हजार 551 मते मिळाली आहेत, तर ममता बॅनर्जी यांना 84 हजार 4 मतं मिळाली आहेत.

कोर्टात जाणार

दरम्यान ममता बॅनर्जी यांनीही आपण न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

“मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही छेडछाड झाल्याची माहिती माझ्याकडे आली आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून आम्ही सत्य समोर आणू,” असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आतापर्यंत 221 जागांवर आघाडीवर आहे. याविषयी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, “हा बंगालच्या लोकांचा, भारतातल्या लोकांचा आणि लोकशाहीचा विजय आहे.”

भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.कोरोनाची स्थिती बघता शपथविधीचा कार्यक्रम छोटेखानी केला जाईल,असं त्या म्हणाल्या.

हा तर रडीचा डाव!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नाव न घेता बंगालमध्ये रडीचा डाव खेळत असल्याची टीका केलीय.

म्हणाले, “बंगालमध्ये मतदारांनी ममता बॅनर्जींना भरभरून पाठिंबा दिला. सबंध देशाच्या सत्तेला त्यांनी पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता पण तिथे जे चाललंय याला रडीचा डाव एवढंच म्हणता येईल.”
?निवडणूक रणधुमाळी... ममता बॅनर्जी यांच्या विजयावरून गोंधळ..!हा तर रडी चा डाव..!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजया बद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करत एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यात ‘ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ममता दीदींनी दाखवून दिले की मोदी शहा यांना देखील हरविता येऊ शकते..
‘पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकटवली. त्या सर्व शक्तींची धुळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाल जनतेचं मनापासून अभिनंदन करतो, असंही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केलं आहे. तर, आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून करोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया,’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर असल्याचं समोर आल्यानंतर राज्यातल्या काही भागात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत.

यात काही लोकांनी हुगळी जिल्ह्यातल्या भाजप कार्यालयाला आग लावली आहे. भाजपनं याप्रकरणी तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. तर तृणमूलनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button