Mumbai

?मोठी बातमी.. पोलिसांनो लॉक डाऊन चे निर्बन्ध कडक करा…!संचारबंदी अंमलात आणा..!आरोग्यमंत्री राजेश टोपे

?मोठी बातमी.. पोलिसांनो लॉक डाऊन चे निर्बन्ध कडक करा…!संचारबंदी अंमलात आणा..!आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात आता १५ मे पर्यंत ब्रेक दि चेन लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यात स्थिती अद्यापही पूर्ण आटोक्यात न आल्याने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेनुसार लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवला जाईल असे संकेत महाविकास आघाडीतील मंत्र्यांनी दिले होते.
काल १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची जाहीर घोषणा करण्यात आली आहे. १ मे सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तसेच, सर्व कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले असून अतिमहत्वाच्या कारणाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तर लॉकडाऊन काळात लागू करण्यात आलेले निर्बंध कठोरपणे पाळण्यात यावेत अशा सूचना पोलीस यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. हे सर्व जनतेच्या आरोग्यरक्षणासाठीच करण्यात येत असल्याने जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
तसेच राज्यात १ मे पासून लसीकरणाची घोषणा करण्यात आली असली तरी लसींचा तुटवडा जाणवत आहे. कोव्हीशिल्डने केवळ ३ लाख लसींची पर्चेस ऑर्डर दिली आहे.आम्हाला १२ कोटी लसींची गरज आहे.त्यासाठीचे पैसे एका चेकद्वारे देण्याची तयारीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शविली आहे. केंद्र सरकारकडे वारंवार हा विषय मांडण्यात आला आहे. कदाचित केंद्र सरकारकडेच लस उपलब्ध नसण्याची शक्यता असू शकेल. पण राज्यातील भाजपाच्या नेत्यांनाही आपले आवाहन आहे की सगळे एकत्र येउन आपण केंद्र सरकारकडे ही मागणी मांडू असेही राजेश टोपे म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button