Nashik

?मोठी बातमी : जिल्हाधिकाऱ्यावर तब्बल 500 कोटींचा मानहानीच दावा

?मोठी बातमी : जिल्हाधिकाऱ्यावर तब्बल 500 कोटींचा मानहानीच दावा

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत नाशिकमधील नामांकित दातार जेनेटिक्स लॅबवर कायमस्वरूपी बंदी का घालण्यात येऊ नये याबाबत खुलासा मागवला होता. यावर संस्थेची प्रतिमा मलिन झाल्याबद्दल जिल्ह्याधिकाऱ्यांवर हा दावा ठोठावला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून दातार जेनेटिक्स लॅब च्या कोरोना चाचण्या रोखण्यात आल्यानंतर दातार जेनेटिक्स लॅबने ५०० कोटी रुपयांचा मानहाणीचा दावा ठोठावला आहे.
काल, नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत नाशिकमधील नामांकित दातार जेनेटिक्स लॅबवर कायमस्वरूपी बंदी का घालण्यात येऊ नये याबाबत खुलासा मागवला होता.
यावर संस्थेची प्रतिमा मलिन झाल्याबद्दल जिल्ह्याधिकाऱ्यांवर हा दावा ठोठावला आहे. दातार जेनेटिक्स कडून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांबद्दल मुख्यमंत्री सचिवालय, आरोग्य विभाग सचिवालय यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. यात, जिल्हा प्रशासन आपले अपयश कसे लपवते आहे याबाबत यात उल्लेख करण्यात आला आहे.
या घटनेनंतर दातार जेनेटिक्स आणि प्रशासन यांतील वाद वाढला आहे. याबाबत आता जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या दाव्यानंतर अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कुठलही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button