Maharashtra

?Big Breaking.. कोरोना पॉझिटिव्ह महिलेकडून डॉ ने केली शरीर सुखाची मागणी..!

?Big Breaking.. कोरोना पॉझिटिव्ह महिलेकडून डॉ ने केली शरीर सुखाची मागणी..!

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये एक धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना घडली आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेकडे शरीरसुखाची मागणी चक्क डॉक्टराने केली असल्याचा आरोप आहे.

मंगळवारी संध्याकाळी ही घटना औरंगाबादमधील पदमपुरा कोविड केअर सेंटरमध्ये घडली. संध्याकाळच्या वेळी या महिलेकडे डॉक्टरने शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर याबाबतची माहिती उपचार घेणाऱ्या महिलेने घरी कळवली. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात शिरुन डॉक्टराला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली. यासर्व प्रकरणी अहवाल सादर करून, चौकशी करावी असा आदेश औरंगाबादच्या आयुक्तांनी दिला.व सदर डॉ ची हकालपट्टी करण्यात आली आहे.

औरंगाबादमधील या धक्कादायक आणि लाजीरवाणी घटनेने डॉ प्रशासन यावर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button