Jalgaon

? जळगांव Live.. कोरोना Update… जळगांव 511 चा आकडा पार तर अमळनेर तालुक्यात 23 रुग्ण कोरोना बाधित..!

? जळगांव Live.. कोरोना Update… जळगांव 511 चा आकडा पार तर अमळनेर तालुक्यात 23 रुग्ण कोरोना बाधित..!

जळगाव जिल्ह्यात ५११ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात जळगाव शहरासह जामनेर तालुक्यातही रूग्ण संख्या वाढत आहे.

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या अहवालातून गेल्या चोवीस तासांमध्ये ५११ कोरोना बाधीत आढळले असून याच कालावधीत जिल्ह्यातील ३१३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर २६७ पेशंट हे जळगाव शहरातील आहेत. तर जामनेर तालुक्यात आज दिवसभरात ७८ नवीन कोरोना बाधीत पेशंट आढळून आले आहेत. चोपडा तालुक्यातील रूग्ण संख्या वाढीस लागली असून आज या तालुक्यात ३८ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता जळगाव तालुका-१२; भुसावळ तालुका-३१; धरणगाव-१६; एरंडोल-७; यावल-२; रावेर आणि पारोळा-प्रत्येकी ६; मुक्ताईनगर-२१; बोदवड-१४; अमळनेर-23 असे रूग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात एकही पेशंट आढळलेला नाही.आज दिवसभरात जिल्ह्यात एकच कोरोना बाधीताचा मृत्यू झाला आहे.

अमळनेर तालुक्यात 15 रुग्ण शहर आणि 8 रुग्ण ग्रामीण भागातील असल्याची माहिती डॉ गोसावी यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button