Amalner

?️अमळनेर कट्टा… महत्वाचे…कोरोना लसीचा  दुसरा डोस मिळालाच नाही तर…? किंवा  दुसरा डोसला उशीर झाला तर…? काय आहेत दुष्परिणाम ? जाणून काय म्हणाले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गोसावी

?️अमळनेर कट्टा… महत्वाचे…कोरोना लसीचा दुसरा डोस मिळालाच नाही तर…? किंवा दुसरा डोसला उशीर झाला तर…? काय आहेत दुष्परिणाम ? जाणून काय म्हणाले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गोसावी

भारत सरकारने 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरच्या सगळ्यांचं लसीकरण सुरू केलं खरं, पण वस्तुस्थिती ही आहे की, अनेक केंद्रांवर सध्या ‘लस उपलब्ध नाही’ अशी माहिती प्रसारित केली जात आहे. परिणामी जनतेत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर गोंधळ देखील उडाला आहे.या संदर्भात अमळनेर तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी यांच्याशी ठोस प्रहार ने संपर्क साधला आणि तुमच्या मनातील प्रश्न उपस्थित करून त्यांनी काय सांगितले ते पहा..

 • लसीचा एक डोस कोरोनाविरोधात किती परिणामकारक?

लशीच्या दुसऱ्या डोसला ‘बूस्टर डोस’ असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या डोसला पूरक आणि वर त्याची ताकद वाढवणारा डोस.

 • हा पहिला डोस कोरोनाचा निम्मा धोका कमी करतो,

 • या लस घेतल्यानंतर 3 आठवड्यांमध्ये या व्यक्तीकडून इतरांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 38 ते 49 टक्क्यांनी कमी होते.
 • लस घेतल्यानंतर 14 दिवसांनी त्या व्यक्तीला कोरोनापासून संरक्षण मिळालं.
लस घेतलेल्या व्यक्तीला आजाराची लक्षणं दिसण्याची शक्यता 4 आठवड्यांनंतर 60 ते 65 टक्क्यांनी कमी झाली आहे.
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार व्हायला दोन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे काही केसेसमध्ये लोकांना मधल्या काळात कोव्हिड झाला असला तरी घाबरण्याचं कारण नाही. एकतर अशा रुग्णांची लक्षणं सौम्य होती. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका कमी झाला होता.
पण काही कारणांनी दुसऱ्या डोसला उशीर झाला तर..? सध्या महाराष्ट्रात लस उपलब्ध होत नाहीत, तर काहींना इतर काही वैद्यकीय कारणांमुळे दुसरा डोस शक्य झालेला नाही.

 • दुसऱ्या डोसला उशीर झाला तर काय करायचं?

  कोविन डॅशबोर्ड पाहिलात तर लगेच लक्षात येईल 29 एप्रिल पर्यंत देशात 14 कोटी 93 लाख लशींचे डोस दिले गेलेत. पण यातले 12 कोटी 38 लाख डोस हे पहिले डोस आहेत. फक्त 2 कोटी 54 लाख लोकांचे दोन्ही डोस झालेत.

  महाराष्ट्रात तर 1 कोटी 32 लाख लोकांचा एक डोस झालाय. पण दोन्ही डोस झालेल्यांची संख्या आहे 25 लाख 12 हजार 396.

  साधारणपणे चार ते सहा आठवड्यात दुसरा बूस्टर डोस घ्यावा, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. पण आता लसच उपलब्ध नसल्यामुळे उशीर झाला तर काय करायचं हा प्रश्न उपस्थित होत आहे.

  डॉ गोसावी यांच्या मते कुठल्याही लसीचा दुसरा डोस कधी घ्यायचा हे ठरलेले आहे . कोव्हिशिल्ड लशीचा दुसरा डोस हा तीन महिन्यांपर्यंत (90 दिवस )घेतला तरी चालतो. कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस चार आठवड्यांनंतर घ्यायचा आहे. त्यात दोन आठवडे उशीर झाला तरी चालेल. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे वेळ जास्त लागतो आहे. पण ज्यांना पहिला डोस दिलाय त्यांना प्राधान्यक्रमाने दुसरा डोस देण्यात येईल.मिळणारच नाही असं नाही त्यामुळे त्यांनी भीती बाळगू नये.

  दुसरा डोस वेळेत मिळालाच नाही तर…?सध्या भारतात दिल्या गेलेल्या 95% लसी या कोव्हिशिल्डच्या आहेत, तर 5% लसी कोवॅक्सिनच्या. पण दोन्ही लशींचा तुटवडा महाराष्ट्रात जाणवतोय. आरोग्य विभागाच्या धोरणानुसार, एकाच लशीचे दोन डोस देणं गरजेचं आहे.

  अशावेळी तुम्हाला हवी असलेल्या लशीचा दुसरा डोस मिळालाच नाही तर? किंवा तुम्हाला दुसरा डोस घेताच आला नाही तर काय होईल तज्ज्ञ डॉक्टरांकडून शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

  डॉ. गोसावी पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडी तयार होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे फारसं घाबरण्याचं कारण नाही.त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

  डॉ. गोसावी यांच्या मते तुम्ही दुसरा डोस घेतला नाही तर पहिल्या डोसमुळे मिळणारं संरक्षण हे कमी आहे. अशा परिस्थितीत पहिला डोस झाल्यानंतरही तुम्हाला कोरोना संसर्ग होण्याचा धोका राहतो. संशोधनात असं समोर आलंय की, दुसऱ्या डोसनंतर कोरोना झाला तरी त्यातला संसर्ग कमी असतो, लक्षणं सौम्य असतात.दुसऱ्या डोस नंतर रुग्णांचा रिकव्हरी झपाट्याने कमीत कमी औषध उपचारात रुग्ण बरा होतो आणि दोन डोस नंतर मृत्यदर हा शून्यच आहे.

  येणाऱ्या काळात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणायची असेल तर लस हा एक प्रभावी उपाय आहे. लसीकरणाला गती मिळाली तर तिसरी लाट आटोक्यात आणता येइल. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणं हे नियम पाळायलाही विसरू नका.सॅनिटायझर चा उपयोग करणे आवश्यक आहे.लसीकरण आवश्यक आहे तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. असे आवाहन डॉ गोसावी,तालुका आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button